शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

सुजलाम, सुफलाम अंतर्गत ३१५ हेक्टरवर समतल चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 13:09 IST

जिल्ह्यात सहा तालुक्यात मिळून एकूण ३१४.१५ हेक्टर क्षेत्रावर खोल व साधारण समतल चर या प्रकारातील जलसंधारणाची कामे वेगाने करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून सुजलाम्, सुफलाम् अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यात सहा तालुक्यात मिळून एकूण ३१४.१५ हेक्टर क्षेत्रावर खोल व साधारण समतल चर या प्रकारातील जलसंधारणाची कामे वेगाने करण्यात येत आहेत. यातील ५१ हेक्टर क्षेत्रातील कामेही पूर्ण झाली आहेत.पाणीटंचाई या समस्येवर कायम मात करून राज्यात जलक्रांती घडविण्यासाठी राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून सुजलाम्, सुफलाम् अभियान राज्यभरात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिमचाही समावेश असून, या अभियानाद्वारे जलसंधारणाची कामे करण्यासाठी बीजेएसकडून जेसीबी आणि पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात येत आहेत, तर प्रशासकीय विभागाच्या यंत्रणेकडून जलसंधारणाची कामे करून घेण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यात या अभियानातून ४६ शेततळी, ३ वनतळी, तसेच ३१४.८६ हेक्टर क्षेत्रात समतल चर खोदण्यात येत आहेत. समतल चर खोदण्यासाठी बीजेएसकडून २१ जेसीबी उपलब्ध करण्यात आल्याने ही कामे वेगाने सुरू होऊन त्यांनी मानोरा तालुक्यातील पिंप्री येथील ३१.४९ हेक्टर क्षेत्रावर, तसेच मंगरुळपीर तालुक्यातील जोडगव्हाण येथे २० हेक्टर क्षेत्रात खोल समतल चराचे कामही पूर्ण करण्यात आले आहे, तर कारंजा तालुक्यातील मोखड, खतनापूर, मानोरा तालुक्यातील सोमनाथ नगर, मालेगाव तालुक्यातील पांगरी धनकुटे, तसेच वाशिम तालुक्यातील घोटा, सोंडा, वार्ला आणि धुमका येथील खोल समतल चरांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्याशिवाय मानोºयातील सोमनाथ नगर, मंगरुळपीर तालुक्यातील चांभई, पिंपळखुटा आणि मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील शेततळ्यांचे कामही वेगाने करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा