शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

वाशिमच्या ‘एकबुर्जी’ प्रकल्पावर ‘फ्लेमिंगो’चे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 16:21 IST

वाशिम : वाशिम शहरापासून जवळच असलेल्या एकबुर्जी प्रकल्पावर परदेशी पाहुणे; अर्थात 'फ्लेमिंगो' उर्फ रोहित पक्ष्यांचे आगमन झाले असून, पक्षीप्रेमींचे पाय प्रकल्पाच्या दिशेने पडत आहेत. 

- नंदकिशोर नारेवाशिम : वाशिम शहरापासून जवळच असलेल्या एकबुर्जी प्रकल्पावर परदेशी पाहुणे; अर्थात 'फ्लेमिंगो' उर्फ रोहित पक्ष्यांचे आगमन झाले असून, पक्षीप्रेमींचे पाय प्रकल्पाच्या दिशेने पडत आहेत. राज्यातील काही भागात सध्या फ्लेमिंगोचे वास्तव्य आढळत असून साधारणत: ३० ते ३५ पक्षांचा एका थवा एकबुर्जी प्रकल्पावर नुकताच दाखल झाला आहे. विदर्भात एवढ्या मोठ्या संख्येने केवळ एकबुर्जी प्रकल्पावरच ‘फ्लेमिंगो’ पक्षी आढळून येतात. गुजरातमधील कच्छ येथून फ्लेमिंगो हे एकबुर्जी जलाशयावर आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत दाखल होत असतात.  यावर्षी फ्लेमिंगोचे आगमन लांबणीवर पडल्याने पक्षीप्रेमींची काहीशी निराशा झाली होती. त्यांच्या आगमनाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत असताना, मागील सात, आठ दिवसांपासून एकबुर्जीच्या पाणलोट क्षेत्रात फ्लेमिंगो दाखल झाल्याने पक्षी प्रेमींत उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते. लालबुंद चोच, लांबसडक मान, उंच असणारे पाय असे त्यांचे लोभस रूप असल्यामुळे त्यांना अग्निपंख असेही संबोधले जाते. मोठ्या संख्येने पक्षी दाखल झाल्यावर त्यांच्या पाण्यामधील शिस्तबद्ध हालचाली नेत्रसुखद ठरतात व भक्ष्य पकडण्यासाठी त्यांनी घेतलेला पवित्रा मनाला मोहून टाकतो. थंडीचे प्रमाण वाढल्यास महिनाभरात आणखी पक्षी दाखल होऊन 'फ्लेमिंगो'च्या आणखी सुंदर 'कवायती' पाहायला मिळतील, अशी अपेक्षा पक्षीप्रेमी दीपक जोशी यांनी व्यक्त केली. 

या ठिकाणी अनेकविधं जातीची बदके, करकोचा, पाणकावळे, चिखले पाकोळ्या, झुडूपी स्थलांतरीत पक्षी, हिवाळ्यातच येणारे हॅरिअर, आॅस्प्रे, ससाणे आदी  पक्ष्यांचे नंदनवन म्हणून एकबुर्जी प्रकल्प ओळखला जातो.  विविध जातींचे पक्षी दाखल झाल्याने एकबुर्जी परिसर चांगलाच बहरून गेला आहे. पश्चिम वºहाडातील पर्यटकांसाठी एकबुर्जी प्रकल्पावर पक्षी पाहण्याची ही अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. वाशिमचे माजी मानद वन्यजीव रक्षक प्रशांत जोशी, पक्षीमित्र योगेश जोशी, प्रवीण जोशी यांच्यासह दीपक जोशी यांनी एकबुर्जी प्रकल्पात या पक्ष्यांचे निरीक्षण केले आहे. फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी संरक्षण पुरविण्याची मागणीही पक्षप्रेमींनी केली. एकबुर्जी प्रकल्प हा विदर्भातील पक्षमित्र, पक्षीप्रेमींसाठी एक मोठी उपलब्धी मानली जात आहे. 

 

गुजरातमधील कच्छ येथून फ्लेमिंगो पक्षी हा एकबुर्जी प्रकल्प येथे स्थलांतरण करीत असतो. एवढ्या मोठ्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी विदर्भातील एकमेव एकबुर्जी प्रकल्पावर दाखल होत असतो. दरवर्षी साधारणत: नोव्हेंबर महिन्यात दाखल होणारा हा पक्षी यावर्षी डिसेंबर महिन्यात दाखल झाला. सध्या ३० ते ३५ पक्ष्यांचा थवा असून, थंडी वाढल्यानंतर फ्लेमिंगोचे प्रमाण आणखी वाढू शकेल. फ्लेमिंगोची शिकार होणार नाही, या दृष्टिने प्रशासनासह सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे ठरत आहे.  - दीपक जोशीपक्षीमित्र

टॅग्स :washimवाशिमbirds sanctuaryपक्षी अभयारण्यNatureनिसर्ग