शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार शौचालयांचे चुकीचे छायाचित्र वगळले ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 15:01 IST

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ केल्यानंतर, काही छायाचित्र चुकीचे असल्याचे निदर्शनात आले. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेच्या जिल्हा स्वच्छता कक्षाने पडताळणी मोहिम हाती घेतली असता, आतापर्यंत पाच हजार शौचालयांचे चुकीचे छायाचित्र वगळण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण १ लाख ३९ हजार ९४० शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करावयाचे आहेत. एक लाख ३८ हजार ९४० शौचालयाचे छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले होते.जिल्हा स्वच्छता कक्षाने शौचालयाच्या छायाचित्रांची पडताळणी केली असता, काही ठिकाणी चुकीचे छायाचित्र अपलोड झाल्याची बाब निदर्शनात आली.

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ केल्यानंतर, काही छायाचित्र चुकीचे असल्याचे निदर्शनात आले. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेच्या जिल्हा स्वच्छता कक्षाने पडताळणी मोहिम हाती घेतली असता, आतापर्यंत पाच हजार शौचालयांचे चुकीचे छायाचित्र वगळण्यात आले आहेत.ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली.  वाशिम जिल्ह्यात शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शौचालयाचे छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ३९ हजार ९४० शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करावयाचे आहेत. मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ व कोळंबी या दोन गावांचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व गावांतील जवळपास एक लाख ३८ हजार ९४० शौचालयाचे छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले होते. याची टक्केवारी ९९.२८ अशी होती. जिल्हा स्वच्छता कक्षाने शौचालयाच्या छायाचित्रांची पडताळणी केली असता, काही ठिकाणी चुकीचे छायाचित्र अपलोड झाल्याची बाब निदर्शनात आली. त्यामुळे शौचालय छायाचित्र प्रकरणी घोळ निर्माण होऊ नये म्हणून पडताळणी मोहिम हाती घेण्यात आली. त्या अनुषंगाने सर्व छायाचित्रांची पडताळणी केली असता,  आतापर्यंत जवळपास ५ हजार छायाचित्र चुकीची आढळून आल्याने सदर छायाचित्रे वगळण्यात आली. शौचालयाऐवजी स्वच्छतागृह तसेच काही ठिकाणी त्याच त्या शौचालयाचे छायाचित्र पुन्हा, पुन्हा अपलोड झाले होते. चुकीचे छायाचित्र वगळण्यात आले असून, पुन्हा अचूक छायाचित्र अपलोड करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान