शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पाच वाहनांचा विचित्र अपघात; एक ठार

By admin | Updated: March 28, 2016 02:26 IST

नागपूर-औंरगाबाद द्रुतगती मार्गावरील अपघात.

जऊळका रेल्वे: नागपूर येथून येणार्‍या कंटेनरने रस्त्यालगत उभ्या असलेल्या चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर चार जण जखमी झाले. ही घटना नागपूर-औंरगाबाद द्रुतगती मार्गावरील जऊळका रेल्वे येथील रेल्वे गेटजवळ रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. कंटेनरचा चालक पसार होण्यात यशस्वी झाला. जऊळका रेल्वे गेट बंद असल्यामुळे एका कंटेनरने उभ्या असलेल्या खुराणाची ट्रॅव्हल व दोन ट्रकला जबर धडक बसल्यामुळे एकमेकांवर आदळून पाचव्या नंबरवर उभा असलेल्या ट्रकचा क्लिनर खाली पडून जागीच ठार झाला. ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना मुका मार बसला असून, टाटा एस वाहनाचा चुराडा झाला. नागपूरकडून येणार्‍या सी.जी.0४ जेए ४४७१ या वाहनाने भर वेगाने येऊन उभ्या असलेल्या टाटा एसला जोरदार धडक दिली. नंतर ते वाहन ट्रॅव्हल क्रमांक एम.एच.0४ एफ. ७९९९ व एम.एच.0४ एफडी ३१६0 व ट्रक क्रमांक एम.एच.0४ सी.यू. ४७५८ या वाहनावर आदळले. एम.एच.0४ सी.यू. ४७५८ या क्रमांकाच्या ट्रकचा क्लिनर सहीम युनुस खॉ (वय ४0 रा. तातो मुरेनी जि. सुलतानपूर, उत्तरप्रदेश) हा जागीच ठार झाला तर रमेश दगडूजी पांडे रा. वडप ता. मालेगाव, आनंदा डाके वारंगी, बाळासाहेब विष्णू सोळंके औंरंगाबाद, नागोराव पौळ औरंगाबाद हे चौघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जऊळका येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून वाशिम व येथून पुढे अकोला येथे हलविण्यात आले. चौघापैकी दोघांचे पाय व एकाचा हात फॅर झाला. रेल्वे गेट बंद असल्यामुळे गाडीतील प्रवाशी खाली उभे असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी जऊळका रेल्वे येथील पोलीस स्टॉप, वाहतूक पोलीस, होमगार्ड यांनी धाव घेतली. या अपघातानंतर एक ते दोन किलोमीटर वाहतूक खोळंबली होती.