शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटाखाली वाजली शाळेची पहिली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 15:45 IST

८२१५१ पैकी ३४२५ विद्यार्थ्यांची तर २५५१ पैकी ८२२ शिक्षकांची हजेरी होती.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाच्या सावटाखाली सोमवार, २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून, शाळेचा पहिला दिवस धाकधुकीचा ठरला. ३६३ पैकी केवळ १४३ शाळांची पहिली घंटा वाजली असून, ८२१५१ पैकी ३४२५ विद्यार्थ्यांची तर २५५१ पैकी ८२२ शिक्षकांची हजेरी होती.यंदा मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद होत्या. आॅक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली आल्याने नोव्हेंबर महिन्याच्या २३ तारखेला शाळेची पहिली घंटा वाजली. कोरोनाच्या सावटाखाली शाळेचा पहिला दिवस कसा राहिल, याची उत्सुकता तसेच धाकधुकही सर्वांनाच होती. जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाºया ३६३ शाळा असून, येथे ८२ हजार १५१ विद्यार्थी संख्या आहे. या शाळेत २५५१ शिक्षक आणि १६६८ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची कोरोना चाचणी केली जात आहे. आतापर्यंत २३८२ शिक्षक आणि ८४३ शिक्षकेतर कर्मचाºयांची चाचणी झाली असून, यापैकी २९ शिक्षक आणि दोन शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ३१ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनाचे सावट असल्याने आणि पूर्ण तयारी झाली नसल्याने पहिल्या दिवशी ३६३ पैकी १४३ शाळा सुरू झाल्या तर ८२१५१ पैकी ३४२५ विद्यार्थी उपस्थित होते. ८२२ शिक्षकांची पहिल्या दिवशी उपस्थिती होती. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शाळेत एका बेन्चवर एक विद्यार्थी बसविण्यात आला तसेच तपासणी करूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. प्रार्थनेच्या वेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर दिसून आला. चार तासिकांसाठी वर्ग सुरू राहत असून, यामध्ये प्राधान्यक्रमाने इंग्रजी, गणित व विज्ञान विषय शिकविण्यात आला. पहिल्या दिवशी ७२९० पालकांनी संमतीपत्र दिले.