शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी अर्जाचा पहिला दिवस ‘निरंक’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 19:57 IST

वाशिम : ७ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याला  १५ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवार अर्ज तहसील कार्यालयात दाखल झाला नाही.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक शक्तीप्रदर्शन ठरणार आचारसंहितेचा भंग

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ७ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याला  १५ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवार अर्ज तहसील कार्यालयात दाखल झाला नाही.ग्रामीण भागातील राजकारण ढवळून काढणाºया ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर दिग्गजांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली. आगामी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केलेला आहे. मात्र, कारंजा तालुक्यातील चार  व मंगरूळपीर तालुक्यातील १० अशा १४ ग्रामपंचायतींची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने आता २७३ ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील ५१ ग्राम पंचायती, कारंजा तालुक्यातील ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज सादर करण्याला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा अशा सहा तहसील कार्यालयात एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही. दरम्यान, उमेदवाराला उमेदवारी अर्ज सादर करताना शक्तीप्रदर्शन करणे किंवा मिरवणुक काढत अर्ज दाखल करणे महागात पडू शकते. अर्ज दाखल करताना उमेदवाराला तीन किंवा तीनपेक्षा अधिक व्यक्ती सोबत नेल्यास आचारसंहितेचा भंग ठरणार आहे. त्यामुळे अर्ज दाखल करताना इच्छूक उमेदवाराला सतर्कता बाळगावी लागणार आहे.