इंझोरी (जि. वाशिम): येथील बसथांब्यावर असलेल्या अजिंक्य फोटो स्टुडिओला आग लागल्याने विविध साहित्य जळून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना १७ मार्च रोजी रात्री ७.३0 वाजताच्या सुमारास घडली.इंझोरी येथील बसथांब्यावर धनराज दिघडे यांच्या मालकीचा फोटो स्टुडिओ आहे. या फोटो स्टुडिओमध्येच झेरॉक्स मशीन, कॉम्प्युटर, पिंट्रर, लॅमिनेशन मशीन आदि महागडी यंत्रे ठेवण्यात आली होती. या स्टुडिओला गुरुवारी रात्री ७.३0 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने रुद्र रुप धारण केले. स्थानिक लोकांनी ही आग विझविली; परंतु त्यापूर्वीच स्टुडिओतील महागड्या वस्तू आणि स्टुडिओचे साहित्य जळाल्याने दिघडे यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी त्यांनी मानोरा पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिस घटनेचा तपास करीत आहेत
फोटो स्टुडिओला आग
By admin | Updated: March 19, 2016 01:12 IST