कारंजा लाड : तालुक्यातील ग्राम इंझा वनश्री येथील अप्सा कोल फॅक्टरीला आग लागून यामध्ये कुटारासह पक्कय़ा मालाचे अंदाजे ७0 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली. कारंजा ते इंझा रस्त्यावरील प्रशांत चौधरी यांच्या शेतात असणा-या अप्सा कोल फॅक्टरीला परिसरात पेटवलेल्या आगीची ठिणगी उडून अचानकपणे आग लागल्याने त्यामध्ये बघता बघता फॅक्टरीमधील ५00 टन कुटार जळून खाक झाले. तर फॅक्टरीमध्ये कुटारापासून तयार करण्यात आलेला पक्का माल जळाला. यासह फॅक्टरीमधील महागड्या मशिनने पेट घेतला. व त्यामुळे अत्याधुनिक मशिनरी काही प्रमाणात जळाल्यात. आगीमुळे फॅक्टरीवरील टीन व लाकडाचे असलेले साहित्य, विद्युत पुरवठा करणारी लाईन जळून खाक झाली. यामध्ये अंदाजे ७0 लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याचे फॅक्टरीचे संचालक प्रशांत चौेधरी यांनी सांगितले.
कोल फॅक्टरीला आग
By admin | Updated: April 4, 2015 02:06 IST