गावातून वीज समस्येबाबत वीज कर्मचारी रामभाऊ कुटे, लाइनमन रवी खाडे यांनी मालेगाव उपकार्यकारी अभियंता जीवनानी यांच्या लक्षात आणून दिली असता कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही झाली. तात्काळ पांगरी नवघरे गावाला तीन किलोमीटर बँच केबल तसेच १०० केव्हीचा नवीन ट्रान्सफाॅर्मर मंजूर केला. या सर्व कामँचे नियोजन, कार्यकारी अभियंत्यांना आदेश, कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता यामुळे पाच ते सहा दिवसांमध्ये सर्व कामे करण्यात आली. दरम्यान या गावातील अवैध वीजजोडणी, मीटर रीडिंगचा प्रश्न हा अजून कायम असून हा प्रश्न कधी दूर होणार, असा प्रश्न समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला. उपकार्यकारी अभियंता जीवनाणी म्हणाले की, अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला. उन्हाळ्यामध्ये वीज वितरण कंपनीच्या वतीने रस्त्यामधील झाडाच्या फांद्या, इतर सर्व कामे प्रथमदर्शी करण्यात येतील. गावकऱ्यांनीदेखील देयकाचा भरणा वेळेवर करून वीज कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन जीवनाणी यांनी केले.
अखेर पांगरी नवघरे गावाला नवीन रोहित्र मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:43 IST