वाशिम : स्तनदा मातांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने प्रत्येक बसस्थानकावर हिरकणी कक्ष सुरू केलेत; मात्र जिल्हय़ा तील बसस्थानकामधील काही हिरकणी कक्ष कुलूपबंद राहत असल्याने व काही कक्षामध्ये जाळे, घाण साचून त्याची स्वच्छ ता होत नसल्याने स्तनदा मातांची गैरसोय होत असल्याचे स्टिंग ऑपरेशन लोकमतने २८ एप्रिल रोजी केले होते. याची दखल घेत जिल्हय़ातील कारंजा, रिसोड व मंगरूळपीर येथील आगारांनी दखल घेऊन स्वच्छता व सुविधा उपलब्ध करून दिल्यात. वाशिम आगाराने मात्र कोणतीही उपाययोजना केल्या नसल्याचे २९ एप्रिल रोजी केलेल्या पाहणीत आढळून आले. हिरकणी कक्षात पंखा, खुर्ची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व स्वच्छतेचा अभाव लोकमतने केलेल्या स्टिंगमध्ये उघडकीस आला होता. आज पुन्हा लोकमत चमूने हिरकणी कक्षाची पाहणी केली असता मंगरूळपीर येथील आगाराने हिरकणी कक्ष स्वच्छ व सुविधा उपलब्ध करून दिल्यात. रिसोड व कारंजा येथील आगारानेसुद्धा हिरकणी कक्षाची स्वच्छता करून स्तनदा मातांना करण्यात येणारे आवाहन फलक दर्शनी भागात लावले. लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे बंद असलेल्या हिरकणी कक्षांचे कुलूप मात्र आज उघडण्यात आलेत.
अखेर हिरकणी कक्षाचे कुलूप उघडले
By admin | Updated: April 30, 2015 01:47 IST