कारंजा लाड : शहरात कोणतीही घटना असो वा अपघात या घटनेची माहीती पोलीसांना त्वरीत व्हावी हेतूने शहर पोलीस स्टेशनला असलेला दूरध्वनी गत चार दिवसापासून बंद असल्याने पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधणा-यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता , यासंदर्भात लोकमतने २१ नोव्हेंबर रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशीत करताच शहर पोलीस विभागाने ताबडतोब दूरध्वनी सुरु केला. कारंजा शहर पोलीस स्टेशनचा असलेला २२२१०० क्रमांक म्हणजे महीला व नागरीकांना सुरक्षा मिळविण्यासाठी असलेली हेल्पलाईन आहे. मात्र गेल्या चार दिवसापासून असलेल्या हा दूरध्वनी बंद असल्याचे माहिती मिळाली व खात्री केल्यानंतर लोकमतच्यावतिने वृत्त प्रकाशित करुन याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली होती. या वृत्तांची दखल घेवून दूरध्वनी सुरु झाल्याने नागरिकांना सोयीचे झाले आहे.
अखेर कारंजा शहर पोलीस स्टेशनचा दुरध्वनी झाला सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 13:43 IST
कारंजा लाड : लोकमतने २१ नोव्हेंबर रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशीत करताच शहर पोलीस विभागाने ताबडतोब दूरध्वनी सुरु केला.
अखेर कारंजा शहर पोलीस स्टेशनचा दुरध्वनी झाला सुरू
ठळक मुद्देलोकमतने प्रकाशित केले होते वृत्त! नागरिकांना झाले सोयीचे!