शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

 वाशिम जिल्हा गॅझेटियर निर्मितीची कार्यवाही अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 13:50 IST

वाशिम : वाशिम जिल्हा गॅझेटियर निर्मितीचे काम राज्य शासनाच्या दर्शनिका विभागामार्फत हाती घेण्यात आले असून, सदर काम अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देप्रत्येक विषयावर स्वतंत्र प्रकरण तालुकानिहाय माहिती संकलन

वाशिम : वाशिम जिल्हा गॅझेटियर निर्मितीचे काम राज्य शासनाच्या दर्शनिका विभागामार्फत हाती घेण्यात आले असून, सदर काम अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.वाशिम जिल्हा गॅझेटियरमध्ये जिल्ह्याची भौगोलिक, ऐतिहासिक, कृषि, उद्योग, बँकिंग, व्यापार, व्यवसाय, दळणवळण, आर्थिक विकास, प्रशासन, सामाजिक सेवा, संस्कृती यासह प्रेक्षणीय स्थळांची सविस्तर माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे. या प्रत्येक विषयांवर स्वतंत्र प्रकरण जिल्हा गॅझेटियरमध्ये समाविष्ट असणार आहे. हे शासकीय प्रकाशन असल्याने व पुढील अनेक वर्षांसाठी हे जिल्हा गॅझेटियर उपयुक्त ठरण्याच्या दृष्टीने यामध्ये प्रत्येक बाबीची अधिक सखोल व अचूक माहिती समाविष्ट केली जाणार आहे. तसेच जिल्हा गॅझेटियरच्या अनुषंगाने संकलित करण्यात येणारी माहिती व त्याची पध्दती याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्व शासकीय विभागांनी व इतर अभ्यासकांनी जिल्ह्याच्या अनुषंगाने अचूक माहिती उपलब्ध करून देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. वाशिम जिल्ह्याला प्राचीन इतिहास असून याबाबतच्या सर्व नोंदी वाशिम जिल्हा गॅझेटियरमध्ये येण्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय माहिती संकलित करण्याचे काम केले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. वाशिम येथे सापडलेली प्राचीन नाणी व इतर वस्तूंची माहिती जिल्हा गॅझेटियरमध्ये आवर्जून समाविष्ट केली जावी, असा सल्लाही द्विवेदी यांनी संबंधितांना दिला आहे.