मंगरुळपीर (वाशिम): तालुक्यातील शहापूर परिसरातील एका १९ वर्षीय युवतीच्या विनयभंग प्रकरणी मंगरुळपीर पोलिसांनी १२ जणांविरुद्ध अँट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी फि र्यादी युवतीने २५ सप्टेंबर रोजी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले होते, की मी आणि माझा मानलेला भाऊ शाहरूखसोबत मानोली येथून मोटारसायकलवर बसून महात्मा फुले चौकात आली असता आरोपी मधु बुरेचा मुलगा, तसेच नितिन विटकरे, कोकरे, गुप्ता यांच्यासह इतर आठ जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून तू मुस्लिम मुलासोबत मोटारसायकलवर बसून का आली, असे विचारत अपमानास्पद शब्दप्रयोग करून आम्हाला अडविले, तसेच आमचा फोटो काढला. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Updated: September 26, 2014 23:41 IST