शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावाने शेतमालाची खरेदी न करणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:51 IST

वाशिम: यावर्षी निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतमालाच्या  उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येत आहे तर दुसरीकडे  हमीभावानुसार बाजार समित्यांमध्येही शेतमालाची खरेदी होत  नसल्याने शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

ठळक मुद्देयुसूफ पुंजानी यांची मागणी शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यावर्षी निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतमालाच्या  उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येत आहे तर दुसरीकडे  हमीभावानुसार बाजार समित्यांमध्येही शेतमालाची खरेदी होत  नसल्याने शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या  पृष्ठभूमीवर हमीभावाने शेतमालाची खरेदी न करणार्‍यांविरुद्ध  गुन्हे दाखल करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी  भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी शुक्रवारी  शासनाकडे केली आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसात सातत्य नव्हते. मृग नक्षत्रात  हजेरी लावल्यानंतर गायब झालेला पाऊस १५ ते २0 दिवसाने  परतला. त्यानंतरही पावसात सातत्य राहिले नाही. ऐन शेंगा  धरण्याच्या कालावधीत पावसाने दडी मारली. त्यामुळे आता मूग,  उडीद पाठोपाठ सोयाबीनच्या एकरी उत्पादनातही प्रचंड घट येत  आहे. अशातच हमीभावानुसार शेतमालाची खरेदी होत नसल्याने  शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. शेतकर्‍यांच्या  कळवळा असल्याचे दाखविणार्‍यांनी किमान हमीभावाने तरी  सोयाबीन, मूग, उडीद आदी शेतमालाची खरेदी करून शे तकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी युसूफ पुंजानी यांनी केली.  शासनाने सोयाबीन, मूग, उडीद यासह सर्व शेतमालाचे हमीभाव  जाहीर केले आहेत. या हमीभावाने शेतमालाची खरेदी करण्याचे  फर्मानही सोडले आहे. तरीदेखील वाशिम जिल्हय़ात शे तमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक  नुकसान होत आहे. ऐन दिवाळीच्या सणादरम्यानच शेतमालाचे  बाजारभाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल होत आहेत. शे तकर्‍यांना दिलासा मिळावा म्हणून हमीभावाने शेतमालाची खरेदी  व्हावी, हमीभाव डावलणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, वाशिम  जिल्हय़ात नाफेड खरेदी केंद्र सुरू करावे आदी मागण्या पुंजानी  यांनी केल्या आहेत.

 

टॅग्स :agricultureशेती