शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतक-यांचे अर्धनग्न उपोषण

By admin | Updated: May 4, 2017 19:33 IST

जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी १ मे पासूनशेतकºयांनी पेनटाकळी प्रकल्प कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

मेहकर (बुलडाणा): तालुक्यातील उटी येथील शेतकऱ्यांच्या पेनटाकळी प्रकल्पात गेलेल्याजमिनीचा मागील १५ वर्षापासून मोबदला मिळाला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवरउपासमारीची पाळी आली आहे. जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी १ मे पासूनशेतकऱ्यांनी पेनटाकळी प्रकल्प कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. मात्रप्रशासनाने या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे ४ मे रोजी संतप्त झालेल्याउपोषणकर्त्यांनी अर्धनग्न उपोषण सुरु केले आहे. या उपरही २ दिवसात न्यायन मिळाल्यास जलत्याग करण्याचा निर्णय उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी घेतला आहे.उटी येथील अनेक शेतकऱ्यांची जमीन पेनटाकळीच्या कामासाठी शासनाने संपादीतकेलेली आहे. संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणे आवश्यकअसतांनाही गेल्या १५ वर्षापासून हा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही.जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी या शेतकऱ्यांनी २५ एप्रिल २०१६ दरम्यान उपोषणकेले होते. त्यावेळी पेनटाकळीच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेटदेऊन संपादीत केलेल्या जमिनीचे दर १५ मे २०१६ पासून मंजूर करुन १० जून२०१६ पासून संपादीत केलेल्या जमिनीची खरेदी प्रक्रिया करण्याचे लेखीआश्वासन दिले होते. परंतु याला जवळपास १ वर्षाचा कालावधी होऊनहीअद्यापपर्यंत जमिनीचा मोबदला मिळाला नाही. तर जमीन खरेदीची प्रक्रियासुद्धा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आलीआहे. जमिनी पेनटाकळी प्रकल्पात गेल्याने उपजिवीकेचे दुसरे कोणतेच साधननाही. तसेच शासनाकडूनही जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे त्रस्तझालेल्या पांडूरंग नामदेव चांदणे, गुलाबराव साहेबराव दाभाडे, शेषरावमोतीराम धोटे, शेख नुर शेख चाँद, गजानन कुंडलीक दाभाडे, भगवान किसननाटेकर, ज्ञानदेव नरहरी काळे, गोविंद दासु राठोड, शेख मुसा शेख अहमद याशेतकऱ्यांनी १ मे पासून  प्रकल्प कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.(तालुका प्रतिनिधी)