शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांचे चरणस्पर्शाने पावन झालेले ‘लाडेगाव’

By admin | Updated: April 29, 2017 14:49 IST

३० एप्रिल हा राष्ट्रसंतांचा जयंती दिवस असून, या औचित्यावर  समस्त  लाडेगाववासियांनी त्यांच्या  स्मृती जागविल्या.

ग्रामस्थांनी जपल्या स्मृती : उद्या तुकडोजी महाराजांची जयंतीकारंजा लाड : मानवतेचे महान पुजारी व ग्रामगीतेच्या माध्यमातून  सर्वधर्म  समभावाची शिकवण देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ६० वर्षांपूर्वी कारंजातील लाडेगावला भेट दिले. त्यांच्या चरणस्पर्शाने लाडेगाव पावण झाले. त्यावेळी राष्ट्रसंतांंनी लोकसहभागासतून या ठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती करून एक प्रेरणा ग्रामस्थांच्या मनात निर्माण केल्याने   या गावातील समस्या कायमची मिटली. ३० एप्रिल हा राष्ट्रसंतांचा जयंती दिवस असून, या औचित्यावर  समस्त  लाडेगाववासियांनी त्यांच्या  स्मृती जागविल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा सहवास म्हणजे जीवनातील एक अमुल्य ठेवा होय. असे मत गुरुदेवप्रेमींनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज १९५७ मध्ये लाडेगाव येथे आले होते. त्यावेळी  गावकऱ्यांच्या सहकार्याने महाराजांनी लोकसहभागातून  गावाशेजारी बंधाऱ्याचे बांधकाम केले. हा बंधारा लाडेगाववासियांसाठी प्रेरणादायक ठरला असून, आजही तो त्याची साक्ष देत आहे.  स्वावलंबन, सेंद्रीय शेती, परसबाग,  खादी कपड्याचा वापर, व्यसनमुक्ती, सामुदायीक प्रार्थना, ध्यान,रामधुन, सर्वधर्म समभाव, ग्रामसफाई गाव तंटामुक्त, स्वच्छता अभियान, ग्रामसभा, लोकसहभागातून गावाचा विकास, सामुहिक विवाह सोहळा,  मुलांवर संस्कार आदि विषयाची गावकऱ्यांनी अंमलबजावणी करावी म्हणून  राष्ट्रसंतांनी या ठिकाणी एक  महिन्याच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्याचे आवाहनही  केले आणि गावातील देवराव पाटील सवाई यांच्या पुढाकाराने  हे प्रशिक्षण पार पडले. या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला वंदनीय राष्ट्रसंतांनी खुद्द हजेरी लावली होती. प्रशिक्षण वर्गात तालुक्यातील शहा, काजळेश्वर, दिघी, अर्लीमदापूर, यासह  असंख्य गावातील गुरुदेव भक्त शिबिरात सहभागी होते.  या  दरम्यान  गाव शेजारी असणाऱ्य  बेंबळा  नदीला पुर आल्यास गावाला पाण्यापासून धोका होता, मात्र महाराजांनी लोक सहभागातून गावाला लागुन मातीचा बांध बांधण्यास गावकऱ्यांना प्रवृत्त केले व बंधारा  बांधला. कधी काळी नदीला पुर आल्यास  त्यापासून संरक्षणासाठी हा बांध उपयोगी ठरतो.  राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या गावात अजुनही गुरुदेव सेवा मंडळाची शाखा कार्यरत आहे.गावात नित्यनियमाने सर्वधर्मीय  सामुदायीक  प्रार्थना मंदिरात सकाळी  सामुदायिक  ध्यान व सायंकाळची  प्रार्थना रामधुन हा कार्यक्रम  ६० वर्षापासून सुरु आहे.