शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या पृष्ठभूमीवर कापड बाजारात तेजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 19:48 IST

दिवाळीच्या पृष्ठभूमीवर महिलांकडून विविध विविध रंगांच्या आणि आधुनिक साड्यांना चांगली मागणी आहे़  कापड बाजारात सध्या काठापदराच्या साड्यांसह पैठणी, सिल्क, सिंथेटिक, ज्यूटच्या पाटीर्वेअर, फॅशनेबल साड्यांना मोठी मागणी आहे़  

ठळक मुद्देरेडीमेड गारमेंटला मागणीकापड दुकानांत ग्राहकांची झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विजयादशमी पाठोपाठ दिवाळीच्या पृष्ठभूमीवर गेले काही महिने जीएसटी व मंदीच्या वातावरणातून कापड बाजार बाहेर आला असून, बाजारात तेजी आल्याचे चित्र पहायला मिळत आहे़  रेडीमेड आणि शुटींग, शर्टिंगसह लाहन मुलांचे कपडे आणि साड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी विविध दुकानांत होत आहे.  दिवाळीच्या पृष्ठभूमीवर महिलांकडून विविध विविध रंगांच्या आणि आधुनिक साड्यांना चांगली मागणी आहे़  कापड बाजारात सध्या काठापदराच्या साड्यांसह पैठणी, सिल्क, सिंथेटिक, ज्यूटच्या पाटीर्वेअर, फॅशनेबल साड्यांना मोठी मागणी आहे़   खास दिवाळीसाठी कापड विके्रत्यांनी वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे़  सध्या बदलत्या ट्रेंड व फॅशननुसार विविध प्रकारचे कपडे बाजारात उपलब्ध आहेत़  दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका व चित्रपटात वापरण्यात आलेल्या साड्यांचीही सध्या क्रेझ महिलांमध्ये दिसून येते़सिल्कमध्ये विविध प्रकार बाजारात आले असून, त्यात मॉडर्न कलरना चांगली मागणी आहे़   साड्यांमध्ये कंची, कांजीवरम, स्टोनवर्क, नेट वर्क, चिकन, गोटापत्ती वर्क आदी साड्यांना मागणी आहे़  पुरुष आणि युवावर्गासाठी पठाणी कुर्ता, सिंघम शर्ट, चेक्स कॉटन शर्ट, पँट असे विविध प्रकार उपलब्ध आहेत़  त्याशिवाय जॅकेट, कुडत्याला मागणी वाढली आहे़  त्यात ट्रॅडिशनल कलरबरोबरच ब्रॉईट कलरना पसंती वाढत आहे़   दिवाळी व पाठोपाठ येणाºया लग्नसराईमुळे पुढील दोन ते तीन महिने कापड बाजारपेठेत चांगलीच वर्दळ पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांत अपुरा पाऊस आणि त्यामुळे घटलेल्या कृषी उत्पादनाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील सर्वच बाजारांत मंदिचे सावट होते; परंतु आता दिवाळीसाठी खरेदी करताना ग्राहकांची गर्दी होत असून, गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत सध्या कापड बाजारात खरेदीचे प्रमाण दुपटीने वाढल्याचे एका कापड विक्रेत्याने सांगितले. 

यंदा साड्यांमध्ये ज्यूट आणि ड्युपिंन सिल्क, लिनन, भागलपुरी, हे नवीन प्रकार बाजारात आले असून, त्याला चांगली मागणी आहे़  पुरुषांसाठी रेडिमेडमध्ये प्रिंटेट कापडांना अधिक मागणी असून, यामध्ये बँ्रडेड कंपन्यांच्या कापड खरेदीवर अधिक जोर दिसत आहे. लोकांना ट्रॅडिशनल लुक हवा असतो; पण त्याच्या जोडीला वेस्टर्न कलरला पसंती दिली जात आहे़  बाजारात अनेक नवीन कलर आले असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे़- सावन राऊत, कापड व्यावसायिक वाशिम 

टॅग्स :diwaliदिवाळी