शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावणे दोन लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार महासन्मानचा लाभ

By दिनेश पठाडे | Updated: June 16, 2023 12:23 IST

राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी; पीएम किसानचे लाभार्थी पात्र.

दिनेश पठाडे, वाशिम : पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार १५ जून रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  पीएम किसानचा लाभ घेत असलेल्या जिल्ह्यातील   १ लाख ८० हजार ३०२ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. त्याच धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे जमा होणार आहेत. सदर योजनेकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात येणार आहेत. पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत.

तसेच केंद्र शासनाने निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ या योजनेसाठी देखील लागू होणार आहेत. पीएम किसान  पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थींना देखील लाभ मिळणार आहे.  राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्याने पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व  पात्र शेतकऱ्यांना महासन्मान लाभ मिळणार आहे.  मात्र, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी केली नसेल, अशा शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी हप्त्यापूर्वी तत्काळ केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी करुन घेणे अनिवार्य आहे. योजने अंतर्गत अपात्र असतानाही लाभार्थीस लाभ प्रदान करण्यात आल्यास सदर रकमेची लाभधारकाकडून रक्कम वसूल केली जाणार आहे. त्यासाठी वसुली महसूल यंत्रणेमार्फत केली जाणार आहे.तीन हप्त्यात मिळणार प्रत्येकी २ हजार

राज्य शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार महासन्मान योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत. केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच तीन टप्प्यात प्रत्येकी २ हजार रुपये मिळणार आहेत. वर्षातील पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा ऑगस्ट ते  नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत वर्ग केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना एकाचवेळी दोन्ही योजनेचा निधी मिळणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी