शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आठवडी बाजाराच्या माध्यमातून सेंद्रीय भाजीपाला मिळणार -        फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 13:40 IST

बुलडाणा :  शेतकºयांचा शेतीमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठीसंत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार उपक्रम राबविण्यात येतआहे. या बाजाराच्या माध्यमातून सेंद्रीय भाजीपाला ग्राहकांना मिळणार आहे.तरी नागरिकांनी या आठवडी बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्रीपांडुरंग फुंडकर यांनी  केले.   जयस्तंभ चौक स्थित नगर पालिकेच्या शाळा क्रमांक दोनच्या आवारात शेतकरीआठवडी  बाजाराचा उद्घाटनीय कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला ...

बुलडाणा :  शेतकºयांचा शेतीमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठीसंत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार उपक्रम राबविण्यात येतआहे. या बाजाराच्या माध्यमातून सेंद्रीय भाजीपाला ग्राहकांना मिळणार आहे.तरी नागरिकांनी या आठवडी बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्रीपांडुरंग फुंडकर यांनी  केले.   जयस्तंभ चौक स्थित नगर पालिकेच्या शाळा क्रमांक दोनच्या आवारात शेतकरीआठवडी  बाजाराचा उद्घाटनीय कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमतीउमाताई तायडे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प सभापतीश्वेताताई महाले, माजी आमदार धृपदराव सावळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीप्रमोद लहाळे,  कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती  जालींदर बुधवत,योगेन्द्र गोडे, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, आत्माचे प्रकल्प संचालकनरेंद्र नाईक आदी उपस्थित होते.   कृषी पणन कायद्यात दुरूस्ती करून शेतकरी आठवडी बाजारांना अधिकृत दर्जामिळाला असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या शेतकरी आठवडी बाजारांमध्येदलालांची साखळी नसणार आहे. त्यामुळे याचा लाभ थेट शेतकºयांना मिळणार आहे.शेतकरी कृषी उत्पादक कंपन्यांचे बियाणे महामंडळाने खरेदी करण्यासाठी वबियाणे विक्रीस परवानगी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शेतकरी कृषीउत्पादक कपन्यांच्या माध्यमातून सेंद्रीय शेतमाल उत्पादन, विपणनाचे मोठेकाम जिल्ह्यात उभे राहीले आहे. या कंपन्यांच्या पाठीशी राज्याचा कृषीविभाग उभा आहे.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी उत्पादक कंपनी फेडरेशनचे अध्यक्षप्रकाश सुरडकर यांनी केले. आठवडी बाजाराचे फित कापून सर्वप्रथम उद्घाटनकरण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्यावतीनेउभारण्यात आलेल्या भाजीपाला स्टॉलला भेट दिली. यावेळी पालकमंत्री वजिल्हाधिकारी यांनी भाजीपालासुद्धा खरेदी केला. तसेच शेतकºयांची विचारपूसकरून माहिती घेतली.  सदर बाजार दर बुधवारला दुपारी ४ ते सायंकाळी ७वाजेपदरम्यान भरविल्या जाणार आहे. तरी नागरिकांनी बाजाराचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले.   कार्यक्रमाचे संचलन गोपाळ जाधव यांनी तर आभार प्रदर्शन अजय देशमुखयांनी केले. याप्रसंगी बुलडाणा जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकारी, नगरपालिकेचे पदाधिकारी, शेतकरी बंधू, कंपन्याचे संचालक आदींची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.