शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांचा तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: August 8, 2014 00:40 IST

आर्थिक मदतीची मागणी : शेकडो शेतकर्‍यांची हजेरी

मानोरा : मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, दुबार पेरणीसाठी एकरी १0 हजार रूपयाची आर्थिक मदत द्यावी, धरणग्रस्त शेतकर्‍यांना प्रमाणपत्राचे वाटप करावे यासह विविध मागण्या संदर्भात माजी आमदार अनंतकुमार पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो शेतमजूर, शेतकर्‍यांचा मोर्चा तहसील कचेरीवर ६ ऑगस्ट रोजी धडकला.शहरातील मानोरा पंचायत समितीपासून सदर मोर्चा दुपारी १२ वाजता निघाला. मोर्चा शिवाजी चौक, दिग्रस चौक मार्ग तहसील कचेरीवर डफड्याच्या तालात शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, आघाडी शासन व प्रशासन यांच्या विरोधात नारेबाजी देत सदर मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य नामदेवराव पाटील होते. सभेला संबोधित करताना माजी आमदार अनंतकुमार पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधी हा शिवसेनेचा आमदार संजय राठोड यांच्या सारखा असावा. कारण त्याने आपल्या मतदार संघातील शेतकर्‍यांच्या गतवर्षीची अतवृष्टी, गारपीट व भिंतीच्या पडझडीची रक्कम पूर्णपणे शेतकर्‍यांच्या स्वाधीन केली आणि इतरही समस्या ते तत्परतेने मार्गी लावतात. आपल्या मतदार संघाचा लोकप्रतिनिधी मात्र शेतकरी, शेतमजुरांच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. आतापर्यंत शेतकरी आत्महत्या होताना पाहिले. मात्र यावर्षीही दुष्काळजन्य परिस्थिती पाहून शेतकर्‍याला कुटुंबासह आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे. तसेच महावितरण कंपनीने येत्या ८ दिवसात तालुक्यातील शेतकर्‍यांचा वीज जोडणीचा प्रश्न मार्गी न लावल्यास कार्यालयात जाऊन आंदोलन उभारून सत्याग्रह करू. विद्यमान आमदार निष्क्रीय असल्यामुळे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेला आज विविध मागण्यासंदर्भात मोर्चा काढण्याची पाळी आलेली आहे.यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष बाबूसिंग नाईक, प्रेमसिंग नाईक, जनार्दन झळके, बाबूसिंग महाराज, डॉ.विठ्ठल घाडगे, पंकज पाल, मोतीराम पाटील आदी मान्यवरांनी मोर्चाच्या सभेला संबोधित केले. यावेळी तहसीलदार ए.पी.पाटील मोर्चास सामोरे जावून निवेदन स्वीकारले. सभेचे संचालन संजय महाराज यांनी केले. प्रास्ताविक डॉ.विठ्ठल घाडगे यांनी तर आभार हुसेन मंत्री यांनी केले.