शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

व्यापारीही स्वीकारेनात शेतक-यांची तूर!

By admin | Updated: May 8, 2017 01:42 IST

कारवाईचा धसका; आर्थिक टंचाईमुळे खरीप हंगाम धोक्यात.

वाशिम: कमी दराने तूर खरेदी करून तीच तूर "नाफेड"कडे विक्री करणार्‍या व्यापारी, दलालांच्या चौकशीचे फर्मान सहकारमंत्र्यांनी दिले. यामुळे व्यापार्‍यांनी कारवाईचा धसका घेत जिल्हय़ातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांकडील तूर खरेदीस "ब्रेक" दिला आहे. परिणामी, शेतकर्‍यांची हजारो क्विंटल तूर बाजार समितीच्या ओट्यांवर पडून राहत आहे. यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर आर्थिक टंचाईत सापडलेला शेतकरी अधिकच हवालदिल झाला आहे. जिल्हय़ात दरवर्षीच्या तुलनेत यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. शासनाने "नाफेड"मार्फत वाशिम जिल्ह्यात तूर खरेदी केली. त्यानुसार, मंगरूळपीर येथे विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, तर कारंजा, मालेगाव, वाशिम आणि अनसिंगच्या उपबाजारात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने ५ हजार ५0 रुपये हमीदर ठरवून शेतकर्‍यांकडून तूर खरेदी केली; मात्र खरेदी सुरू करण्यापूर्वी साठवणूक आणि इतर तांत्रिक मुद्यांचे नियोजन न केल्यामुळे तसेच मध्यंतरी बारदाना टंचाईसह इतर अनेक अडचणी समोर करून तूर खरेदी अधूनमधून खंडित करण्यात आली. शेवटी २२ एप्रिलपर्यंत ज्या शेतकर्‍यांनी ह्यनाफेडह्णच्या केंद्रावर तूर आणली, त्यांच्याच तुरीची मोजणी करून खरेदी करण्याचे निर्देश शासनाने दिले. असे असले तरी वेळेवर वाहन न मिळणे यासह इतर तत्सम अडचणींमुळे जिल्हय़ातील अनेक शेतकरी २२ एप्रिलपर्यंत तूर बाजार समितीत नेऊ शकले नाहीत. अशा शेतकर्‍यांची तूर आता नाफेडसोबतच व्यापारीही स्वीकारण्यास तयार नसल्याचे चित्र जिल्हय़ातील सर्वच बाजार समित्यांमध्ये दिसून येत आहे. "नाफेड"कडे प्राप्त शेतकर्‍यांची तूर मोजायला लागणार आणखी आठ दिवस!शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, २२ एप्रिल २0१७ पर्यंत ह्यनाफेडह्णने शेतकर्‍यांकडील तूर स्वीकारली; मात्र ५ हजार ५0 रुपये हमीदरानुसार खरेदी केली जाणारी ही तूर तब्बल २ लाख क्विंटलपेक्षा अधिक असून, ती मोजणी करण्यासाठी आणखी किमान आठ दिवस लागतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. या विलंबामुळे मात्र शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन पूर्णत: कोलमडले असून, त्यांच्यासमोर खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे, खत खरेदीचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.रिसोडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर २९ डिसेंबर २0१६ ते १ एप्रिल २0१७ या कालावधीत २,६७६ शेतकर्‍यांकडून हमीदराने ३0 हजार ८५२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली; मात्र सध्या बारदानाच शिल्लक नसल्याने हजारो क्विंटल तूर मोजणीअभावी तशीच पडून आहे. विशेष बाब म्हणजे यात आमदार अमित झनक यांच्या १00 क्विंटल तुरीचाही समावेश आहे. दरम्यान, शेतकर्‍यांची तूर तातडीने खरेदी करण्याबाबत खरेदी-विक्री संघाने पाठपुरावा केला.