शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
3
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
4
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
5
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
6
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
7
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
8
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
9
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
10
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
11
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
12
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
13
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
14
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
15
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
16
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
17
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
18
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
19
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
20
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

पीकविम्याने घडविला सेतू सुविधा केंद्रावरच शेतक-यांना मुक्काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 17:43 IST

प्रधानमंत्री पीकविमा योजनेची अंतिम मुदत ४ ऑगस्टपर्यंत असल्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर यादिवशी सेतू सुविधा केंद्रांवर शेतक-यांची अक्षरश: झुंबड उडाली.

वाशिम, दि. 5 - प्रधानमंत्री पीकविमा योजनेची अंतिम मुदत ४ ऑगस्टपर्यंत असल्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर यादिवशी सेतू सुविधा केंद्रांवर शेतक-यांची अक्षरश: झुंबड उडाली. मात्र, ‘सर्व्हर डाऊन’च्या तांत्रिक अडचणींमुळे रात्री उशीरापर्यंत अर्ज स्विकारलेच गेले नाहीत. परिणामी, रात्रीच्या सुमारास गावी परत जाण्याची सोय नसल्याने शेकडो शेतक-यांना सेतू सुविधा केंद्रावरच मुक्काम करावा लागल्याचा प्रकार कारंजात घडला.जिल्ह्यातील नऊ पिकांकरिता लागू करण्यात आलेल्या पिकविमा योजनेची अंतीम मुदत पुर्वी ३१ जुलै २०१७ होती. मात्र, शेतक-यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यास शासनाने ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. अशातच २ ऑगस्टला निर्णय फिरवत मुदत ४ ऑगस्टपर्यंत करण्यात आली. मात्र, अर्ज ऑफलाईन नव्हे; तर ऑनलाईन स्विकारण्याची अट टाकण्यात आली. पुन्हा तिस-यांदा ४ ऑगस्टला सायंकाळी निर्णय बदलण्यात येवून ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पीकविमा काढण्यास मंजूरी मिळाल्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडे धडकले. एकूणच या सर्व गदारोळात प्रशासनासोबतच शेतक-यांचीही चांगलीच गोची झाली. दरम्यान, महा ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र या दोन्हीही संस्थांमार्फत ‘ऑनलाईन’ अर्ज स्विकारत असताना ‘सर्व्हर डाऊन’ची तांत्रिक अडचण उद्भवल्यामुळे ४ ऑगस्टला दिवसभर ताटकळत बसलेल्या शेतक-यांचे अर्ज रात्री उशीरापर्यंतही स्विकारले गेले नाहीत. कारंजा येथील सेतू सुविधा केंद्रावर घडलेल्या या प्रकारामुळे शेतक-यांना काम न होताच त्याचठिकाणी मिळेल त्या जागेवर झोपून रात्र काढावी लागली. यामुळे शेतक-यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.