शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तहसील कार्यालयासमोर शेतकरीपुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 20:10 IST

मानोरा (वाशिम): पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहिर योजनेत अन्याय झाल्याचे कारण समोर करून तालुक्यातील कारपा येथील शेतकरीपुत्र राजूसिंग तुळशीराम जाधव यांनी तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला हाती रॉकेलची कॅन घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देपालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर  योजनेत तुळशिराम जाधव यांनी आवश्यक सर्व कागदपत्रांची पुर्तता केली, तरीही त्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात आला.मागणीची दखल न घेतल्यास २६ जानेवारी रोजी तहसील कार्यालय परिसरात आत्मदहन करणार असल्याचा इशारा राजूसिंग जाधव यांनी दिला होता. यावेळी प्रसंगावधान राखून पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले.

मानोरा (वाशिम): पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहिर योजनेत अन्याय झाल्याचे कारण समोर करून तालुक्यातील कारपा येथील शेतकरीपुत्र राजूसिंग तुळशीराम जाधव यांनी तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला हाती रॉकेलची कॅन घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पोलिसांनी बाळगलेल्या सतर्कतेमुळे कुठलाही अनर्थ घडला नाही. पोलिसांनी जाधव यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर  योजनेत तुळशिराम जाधव या शेतकºयांनी आवश्यक सर्व कागदपत्रांची पुर्तता केली, तरीही त्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात आला. दुसरीकडे अधिकारी व संबंधित यंत्रणेने बोगस लाभार्थ्यांना विहीरीचा लाभ मिळवून दिला. त्याची सखोल चौकशी व्हायला हवी. या मागणीची दखल न घेतल्यास २६ जानेवारी रोजी तहसील कार्यालय परिसरात आत्मदहन करणार असल्याचा इशारा राजूसिंग जाधव यांनी दिला होता. त्यानुसार, प्रजासत्ताकदिनी त्यांनी आपल्यासोबत रॉकेलची कॅन घेवून तहसील कार्यालयाच्या मागच्या बाजूने तहसीलमध्ये प्रवेश केला. ‘जय जवान जय किसान’चा नारा देत स्वत:ला पेटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखून पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक व्ही.व्ही. वानखेडे यांच्या फिर्यादीवरून राजूसिंग जाधव यांच्याविरूद्ध कलम १०७, ११६ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.कारपा येथील पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहिर योजनेचा लाभ चुकीच्या लाभार्थींना दिला असेल तर त्याची सखोल चौकशी होईल. दोषी आढळणाºयांची हयगय केली जाणार नाही. - सुरज गोहाड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मानोरा

टॅग्स :washimवाशिम