शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड येथे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धांदल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 10:58 IST

पीककर्जासाठी फेरफार आवश्यक असल्याने तहसिल कार्यालयातही शेतकºयांची एकच गर्दी होत असल्याचे २७ व २८ मे रोजी दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : खरीप हंगाम जवळ येत असून, पीककर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. पीककर्जासाठी फेरफार आवश्यक असल्याने तहसिल कार्यालयातही शेतकºयांची एकच गर्दी होत असल्याचे २७ व २८ मे रोजी दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मध्यंतरी लॉकडाउनमुळे शेतीविषयक कामे प्रभावित झाली होती. २० एप्रिलपासून शेतीविषयक कामांना संचारबंदीतून सुट मिळाल्यानंतर नांगरणी, वखरणी, काडीकचरा वेचणी यासह शेती मशागतीच्या अन्य कामांना शेतकºयांनी गती दिली. आता शेती मशागतीची कामे पुर्णत्वाकडे आल्यानंतर खते, बियाण्याची जुळवाजूळव करण्यासाठी पीककर्ज काढण्याकडे शेतकरी मोठ्या संख्येने वळत आहेत. दरम्यान, तालुक्यातील पुनर्गठण झालेल्या अनेक शेतकºयांना नवीन पीककर्ज मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या. संबंधित बँकेने २०० ते २५० शेतकºयांचे परस्पर पुनर्गठण केल्याने आणि त्यांचे हप्ते न भरल्याने या शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही. यासंदर्भात फेब्रुवारी, मार्च महिन्यात शेतकºयांनी रिसोड येथे आंदोलनही केले होते. परंतू, अद्यापही त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही. दुसरीकडे पीककर्जासाठी फेरफार आवश्यक केल्याने आणि फेरफार काढण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर तहसिल कार्यालयात शेतकºयांची प्रचंड प्रमाणात गर्दी होत असल्याने पीककर्जासाठी असलेली फेरफारची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य पुजा अमोल भुतेकर यांनी २८ मे रोजी तहसिलदार अजित शेलार यांच्याकडे केली. यावर वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागविले जाईल, असे आश्वासन शेलार यांनी दिले. आधार प्रमाणिकर अपूर्णकोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मध्यंतरी आधार प्रमाणिकरण बंद करण्यात आले. त्यामुळे महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र ठरूनही तालुक्यातील अनेक शेतकºयांना अद्याप कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही. या शेतकºयांना नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्जRisodरिसोड