शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाफेड केंद्रांवर शेतकऱ्यांची झुंबड

By admin | Updated: May 16, 2017 01:38 IST

वाशिम : येत्या ३१ मेपर्यंत शासकीय तूर खरेदी होणार असल्याने हमीभावात तूरीची विक्री व्हावी म्हणून जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रांवर एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येत्या ३१ मेपर्यंत शासकीय तूर खरेदी होणार असल्याने हमीभावात तूरीची विक्री व्हावी म्हणून जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रांवर एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे.सन २०१३ ते २०१५ या दरम्यान निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. खरिप हंगामात पावसाच्या अनियमित हजेरीने शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतर पावसाने दगा दिल्याने उत्पादनात प्रचंड घट आली. रब्बी हंगामात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली होती. सलग तीन वर्षे वाशिम जिल्हा दुष्काळाच्या छायेत होता. शासनाने दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषितही केले होते. सन २०१६ या वर्षात निसर्गाने साथ दिल्याने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले. मात्र, या वर्षातच शेतमालाचे बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ आलेच नाहीत. शासनाने तूरीला ५०५० रुपये हमीभाव जाहिर केलेला आहे. मात्र, बाजार समित्यांमध्ये हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी नाफेड केंद्रांवर मोठ्या संख्येने वळत आहेत. मध्यंतरी शासनाने नाफेडची तूर खरेदी बंद केली होती. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता ३१ मे पर्यंत शासकीय तूर खरेदी होणार आहे. प्रथम नाफेड केंद्रांवर नोंदणी करून ‘टोकन’ घेणाऱ्या शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली जाणार आहे. ग्रेडर व गोदामाचे नियोजन नसल्याने १२ मे पर्यंत नाफेड केंद्रावर तूर खरेदीला सुरूवात होऊ शकली नव्हती. १३ मे पासून जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, कारंजा व मंगरूळपीर येथे शासकीय खरेदी सुरू आहे. मानोरा येथे नाफेड केंद्र नाही तर रिसोड बाजार समितीत नाफेडची खरेदी सुरू होऊ शकली नाही. टोकन घेण्यासाठी मालेगाव, वाशिम, कारंजा व मंगरूळपीर येथे शेतकऱ्यांची झुंबड उडत असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. ट्रक्टर व अन्य प्रकारच्या वाहनांमध्ये तूर आणली जात आहे. टोकन घेताना वाहन क्रमांक नोंदविणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांना अगोदरच ‘वाहन’ बुक करण्याची वेळ आली आहे.