शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:51 IST

नुकतीच जमिनीवर आलेल्या पिकाची होत असलेली नासाडी कोरडवाहू शेतकरी उघड्या डोळ्याने पाहात आहेत. शेतातील कामधंदे बंद पडल्यामुळे ग्रामीण भागातील ...

नुकतीच जमिनीवर आलेल्या पिकाची होत असलेली नासाडी कोरडवाहू शेतकरी उघड्या डोळ्याने पाहात आहेत. शेतातील कामधंदे बंद पडल्यामुळे ग्रामीण भागातील मजूर ठाण मांडून घरी बसला आहे. दररोज उजाडणारा दिवस पाण्याविना कोरडा जात असल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे. येत्या चार-पाच दिवसांत पावसाने हजेरी न लावल्यास अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागणार आहे. यंदा वेळेवरच मान्सूनचे आगमन होईल व तो सरासरीपेक्षा जास्त पडणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. या अंदाजानुसार ७ ते १० जूनच्या दरम्यान मान्सूनच्या पावसाने सुरुवात करून दिली होती. त्यामुळे पावसाळा सुरू झाला, असे समजून ९० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु ही पिके जमिनीवर येत नाहीत, तोच पावसाने दहा ते पंधरा दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे झालेली पेरणी धोक्यात सापडली आहे. तर पावसाअभावी अद्यापही काही पेरण्या रखडल्या आहेत, तर ज्या शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरणी केली, अशा हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांनी खाली माना टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच दररोज कडक उन्ह पडत असल्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होत चालला आहे. पिकांना वाचवण्यासाठी अनेक शेतकरी पाणी देऊन पिकांना वाचवण्याची धडपड करीत आहे; परंतु ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही, अशा शेतकऱ्यांना डोळ्यासमक्ष पिकाचे नुकसान पाहण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.