शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

हमीदराअभावी शेतकरी संतप्त

By admin | Updated: February 5, 2017 02:13 IST

कारंजातील स्थिती; सभापतीचा शेतमाल तारणाचा सल्ला.

कारंजा लाड, दि. ४- कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची खरेदी हमीभावाने होत नसल्याने तूर उत्पादक शेतकर्‍यात संतापाची लाट उसळली आहे. याच कारणामुळे शेतकर्‍यांनी ४ फेब्रुवारी रोजी कृषी बाजारात काही काळ तुरीचा लिलाव बंद पाडला.शेतकर्‍यांचा शेतमाल बाजारात आला, की भाव पडणे काही नवीन नाही; परंतु त्यातही खरेदी करणारे व्यापारी त्याचा फायदा घेऊन शेतमाल भाव पाडून खरेदी करतात. संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा मांडण्यासाठी थेट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीच्या दालनात धाव घेतली. यावेळी सभापती प्रकाश डहाके यांनी संतप्त शेतकर्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शासनाने बाजार समितीला तूर हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात येऊ नये, असे पत्र दिले; परंतु त्या पत्रात हमीभाव ४६00 की ५0५0 याबद्दल स्पष्ट उल्लेख नाही. दरम्यान, तुरीचे भाव कमी आहेत हे सभापतींनी मान्य केले; परंतु व्यापार्‍यांना जास्त भावाने खरेदी करण्यास आपण सांगू शकत नाही. शेतकर्‍यांनी आपला माल बाजार समितीकडे तारण ठेवून त्यावर ७५ टक्के रकमेची उचल करून आपला व्यवहार करावा व भविष्यात भाव वाढल्यानंतर तूर विकावी, असा सल्ला सभापती प्रकाश डहाके यांनी यावेळी संतप्त शेतकर्‍यांना दिला.