शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा येथे तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 17:08 IST

मानोरा   :  तालुक्यातील शेतकऱ्यांची तुर घेणे बंद झाल्याने हतबल झालेला शेतकरी वर्गासमोर बि- बियाणे व पेरणीचा गंभीर प्रश्न उभा झाला आहे. 

ठळक मुद्दे शेतकऱ्यांची तुर  खरेदीसाठी मानोरा शहरातील  दिग्रस चौकात २३ मे रोजी दुपारी १२ वाजता शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्तारोको आंदोलन करण्यात आले.  तब्बल दिड तास चालेल्या आंदोलनात तहसील प्रशासनाने प्रतिनिधी, सहाय्यक दुय्यम निबंधक यांनी आंदोलकांशी चर्चा करुन निवेदन स्वीकारले.

मानोरा   :  तालुक्यातील शेतकऱ्यांची तुर घेणे बंद झाल्याने हतबल झालेला शेतकरी वर्गासमोर बि- बियाणे व पेरणीचा गंभीर प्रश्न उभा झाला आहे.  घरात तुर पडुन असुन शासन घेण्यास तयार नाही. सावकाराजवळ जावे तर बेभाव किंमतीने तुरीची मागणी करत आहेत. शेतकºयांच्या या गंभीर विषयावर शिवसेनेच्यावतीने वारंवार निवेदन पत्रे, विनंती करुनही कुंभकर्णी झोपलेले खरेदी विक्री संघ, तहसील प्रशासन व दुय्यम निबंधकांना जागे करुन शेतकºयांची तुर नाफेड व्दारे पुर्ववत सुुरु करुन अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तुर  खरेदीसाठी मानोरा शहरातील  दिग्रस चौकात २३ मे रोजी दुपारी १२ वाजता शिवसेनेचे उपतालुका प्रमुख युवराज विजय जाधव , शहर प्रमुख मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

या आयोजनात शेकडो शेतकरी बांधवांनी उस्थित राहायचे असे आवाहन आयोजक शिवसेना तालुका सचिव ओम बलोदे, उपतालुका प्रमुख सुनिल जाधव यांनी केले होते.  यावेळी  पोलिस प्रशासनानी चोख बंदोबस्त ठेवला होता. तब्बल दिड तास चालेल्या आंदोलनात तहसील प्रशासनाने प्रतिनिधी, सहाय्यक दुय्यम निबंधक यांनी आंदोलकांशी चर्चा करुन निवेदन स्वीकारले. या बाबत  १९ मे  रोजी शिवसेनेच्यावतीने स्थानिक तहसील प्रशासन व पोलिस प्रशासन दुय्यम निबंधक  व खरेदी विक्री संघाला निवेदन देवुन नाफेडची तुर खरेदी सुरु करण्याची मागणी केली होती. पंरतु शिवसेनेच्या मागणीची दखल न घेण्यात आल्याने शेतकºयांना भेडसावणाºया अतिशय ज्वलंत प्रशासन आज वाचा फोडण्याचे काम शिवसेनेचे उपतालुका प्रमुख युवराज विजय जाधव ता.सचिव ओम बलोदे, शहर प्रमुख मनोज राठोड, उपतालुका प्रमुख सुनिल जाधव यांनी केले .  मागील सतत तीन वर्षापासुन पडणाºया दुष्काळामुळे सावकार दारात येवु दे ना व बँक थकीत कर्जापायी कर्ज  पुरवठा करण्यात असमर्थता दर्शविल्यामुळे आमची तुर घ्या असा टाहो आंदोलनादरम्यान शेतकरी वर्गांनी फोडला.  दिलेल्या निवेदनानुसार चार दिवसात नाफेडची तुर खरेदी पुर्ववत सुरु करण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकºयांची तुर खरेदी करण्याची हमी देवनु न्याय न दिल्यास आता तीव्र स्वरुपाचे आंदोलन आम्ही शिवसेनेच्या वतीने छेडु असा गंभीर इशारा शिवसेनेचे उपतालुका प्रमुख युवराज विजय नाईक यांनी केले. 

आंदोलनात मा.शहर प्रमुख मनोहर राठोड सचिव ओम बलोदे, उपतालुका प्रमुख सुनिल जाधव, ब्रम्हा जाधव, रोहीदास राठोड, रमेश चव्हाण, वसंता राठोड, भरोस राठोड, अंबादास राठोड, रमेश भोयर,  विष्णु चव्हाण आदि शेतकºयांनी केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच शेतकºयांनी सुध्दा स्वयंस्फुर्तीने या आंदोलनात सहभाग नोंदविला होता.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा