शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीच्या अनुदानासाठी शेतकरी महिलेचा आत्मदहनाचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 15:00 IST

महिला शेतकरी लाभार्थी  प्रभाबाई धर्मा गवई या संबंधित विभागाकडे वारंवार चकरा मारून थकल्या असून, याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांकडे निवेदन देऊन विहिरीचे अनुदानाची मागणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव: तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील शेतकरी लाभार्थ्यांने सिंचन विहिरीचे खोदकाम व बांधकाम करुन सहा महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप बांधकामाचे पैसे मिळाले नाही. विहिर बांधकामाच्या अनुदानासाठी महिला शेतकरी लाभार्थी  प्रभाबाई धर्मा गवई या संबंधित विभागाकडे वारंवार चकरा मारून थकल्या असून, याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांकडे निवेदन देऊन विहिरीचे अनुदानाची मागणी केली आहे. याची दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे. जिल्हाधिकारी आणि  पालकमंत्री राठोड यांना दिलेल्या निवेदनानुसार प्रभाबाई धर्मा गवई यांना पालकमंत्री सिंचन विहिर अंतर्गत रोजगार हमी योजनेतून विहिर मंजूर झाली होती. त्यांनी उसनवारी पैसे घेऊन विहिरीचे खोदकाम केले; परंतु सबंधित अधिकाºयांच्या हलगर्जीमुळे खोदकाम अनुदान दुसºयाच खात्यात जमा झाले. पावसाळ्यात विहीर खचू नये यासाठी सबंधित अधिकाºयांनी सांगितल्यानुसार सदर लाभार्थी शेतकरी महिलेने विहिरीचे बांधकाम पूर्ण केले. विहिरीचे बांधकाम २७ जून २०१८ रोजी पूर्ण केले. त्यानंतर रोजगार सेवक यांनी तांत्रिक अधिकारी राठोड यांनी मोजमाप घेत एमपी करुन आॅनलाईन केली. रोहयो उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली असता शासनाने निधी पाठविला नाही. निधी आल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील, असे सांगितले. दोन वेळा निधी येऊनही विहिरीचे अनुदान मिळाले नाही. येत्या ७ दिवसांत विहिरीचे अनुदान न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी लाभार्थी महिला प्रभाबाई धर्मा गवई यांनी दिला आहे.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव