शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला नाल्यावर बंधारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 11:50 IST

Farmer of Washim builds dam शेतकरी सुखदेव हरणे यांनी स्वखर्चाने बंधारा बांधला असून, त्याचा फायदा  शेतकरी घेऊन सिंचनाच्या आधारे विविध पिके घेत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार :  मालेगाव तालुक्यात आणि शेलूबाजार परिसरात असलेल्या सोनल प्रकल्पातून सिंचनासाठी सोडल्या जाणारे बहुतांश पाणी कालव्याबाहेर वाहून शेलूबाजार परिसरात असलेल्या नाल्यात जमा होते.  हे पाणी अडविण्यासाठी शेलूबाजार येथील शेतकरी सुखदेव हरणे यांनी स्वखर्चाने बंधारा बांधला असून, त्याचा फायदा  शेतकरी घेऊन सिंचनाच्या आधारे विविध पिके घेत आहेत. मालेगाव पाटबंधारे उपविभागांतर्गत सोनल प्रकल्पातून शेलूबाजार परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. या पाण्याच्या आधारे शेलूबाजारसह परिसरातील गावचे शेतकरी शेकडो हेक्टर क्षेत्रात सिंचन करून विविध पिके घेत आहेत. शेतकऱ्यांसाठी कालव्याद्वारे सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर अनेक शेतकरी कालव्याचे मायनर बंद करीत नाहीत. त्यामुळे हे पाणी कालव्यातून बाहेर निघते आणि शेंदुरजना-शेलूबाजारदरम्यान वाहणाऱ्या  खारीनाल्यात येते. त्यामुळे खारी नाला म्हणून ओळखला जाणारा हा नाला, तुडुंब भरून वाहतो. प्रत्यक्षात या पाण्याचा अपव्यय होत असल्याने सुखदेव हरणे यांनी या नाल्यावर स्वखर्चाने बंधारा बांधला. त्यामुळे या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी थांबून राहत असल्याने  नाल्याच्या काठी शेती असलेले शेतकरी या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करून विविध पिके घेत आहेत.  सोनल प्रकल्पाव्या कालव्यात सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. हे पाणी खारी नाल्यात वाहून येते. त्यामुळे नाल्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. हे पाणी अडविल्यास आम्हाला सिंचन करणे शक्य होईल, म्हणून मी स्वखर्चाने या नाल्यात बंधारा बांधला. आता नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने आम्ही उपसा पद्धतीने सिंचन करीत आहोत.- सुखदेव हरणे, शेतकरी शेलूबाजार

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी