शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी बिजोत्पादन केंद्र करणार अनुदानित बियाण्यांपेक्षा कमी दराने विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:31 IST

बिजोत्पादन करणारे शेतकरी गट अडचणीत आले असून, शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील अशा पाच खासगी शेतकरी बिजात्पादन केंद्रांनी शासनाच्या अनुदानित हरभरा बियाण्यांच्या दरापेक्षा क मी दराने हरभरा बियाणे विकण्याचा निर्णय घेत आहे. 

ठळक मुद्देशासनाच्या धोरणाचा निषेधवाशिम जिल्ह्यातील पाच गटांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने शेतकºयांचे गट तयार करून त्यांना बिजोत्पादन कंपन्या सुरू करण्याचे आवाहन करतानाच त्यांनी उत्पादित केलेल्या बियाण्यांची खरेदी करून ते बियाणे अनुदानावर विकण्याचा निर्णयही घेतला; परंतु विद्यमान शासनाने या संदर्भातील पूर्वी अध्यादेश बदलला आहे. त्यामुळे बिजोत्पादन करणारे शेतकरी गट अडचणीत आले असून, शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील अशा पाच खासगी शेतकरी बिजात्पादन केंद्रांनी शासनाच्या अनुदानित हरभरा बियाण्यांच्या दरापेक्षा क मी दराने हरभरा बियाणे विकण्याचा निर्णय घेत आहे. महाराष्ट्रातील आघाडी शासनाने शेतकरी गटाच्या माध्यमातून बीज उत्पादन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. या कंपन्यांकडून बियाणे खरेदी करून शेतकºयांना अनुदानावर वितरीत करण्यासाठी शासन निर्णय जारी करून शेतकरी बीजोत्पादन केंद्रांना कोट्यवधींचे अनुदान देण्यात आले. या शेतकरी कंपन्यांकडून हरबरा बियाणे ९० रुपये प्रतिकिलो दराने घेऊन ६५ रुपये प्रमाणे अनुदानावर शेतकºयांना वितरीत केल्या जात होते. त्यामुळे वाशिमसारख्या लहान जिल्ह्यातही शेलगाव, बोरगाव, बाळखेड, किनखेडा तसेच चांभई याठिकाणी शेतकरी गट स्थापन करून शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत पाच बीजोत्पादन कंपन्या उभ्या राहिल्या. मात्र, यंदा महाबीज, एन. एस. सी. या कंपन्यांकडून ९० रुपये किलो याप्रमाणे हरबरा बियाणे खरेदी करून शेतकºयांना ६५ रुपये प्रमाणे अनुदानावर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील पाचपैकी एका कंपनीला त्यांनी तयार केलेले ७ हजार क्विंटल हरबरा बियाणे मातीमोल भावाने विकावे लागणार आहे. परिणामी, शेतकºयांच्या या कंपनीला तब्बल १ कोटी ७५ लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. शासनाच्या निर्णयामुळे वाशिम जिल्ह्यातील पाचही शेतकरी बीज उत्पादन कंपन्यांचा अडचणीत आल्याने कोट्यवधींचा फटका सहन करावा लागणार आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी निर्णयाचा निषेध करण्यासाठी या शेतकरी कंपन्यांनी अनुदानित हरभरा बियाण्यांच्या ६५ रुपये दरापेक्षा कमी दराने हरभरा बियाणे विकण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :agricultureशेती