शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

शेतकरी आक्रमक; जिल्ह्यात ‘रास्ता रोको’

By admin | Updated: June 6, 2017 01:18 IST

अकोला-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प : मानोरा येथे सर्वपक्षीय नेते एकवटले

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी होत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व विविध संघटनांनी सोमवारी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले.रिसोड येथे लोणी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी संपाच्या समर्थनार्थ रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली. शेलुबाजार येथील कृषी सेवा केंद्र संचालकांनी दुकाने बंद ठेवून या संपाला पाठिंबा दर्शविला. शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शिरपूर येथे आंदोलन करण्यात आले. रिसोड तालुक्यातील कुकसा फाटा येथे काँग्रेस पदाधिकारी व शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. मानोरा येथे सर्वपक्षीय नेत्यांनी व शेतकऱ्यांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मालेगाव येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी तर मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा फाटा येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. कारंजा व मानोरा येथे बंद पाळण्यात आला. मानोरा येथे बंदला १०० टक्के प्रतिसाद लाभला. रिसोड तालुक्यातील मोप व मांगुळझनक तसेच कारंजा तालुक्यातील धनज बु. येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाणे बंद ठेवून शेतकरी संपाला पाठिंबा दर्शविला. वाशिम तालुक्यातील टणका, सोनगव्हाण येथील शेतकऱ्यांचा बेमुदत संप सुरूच आहे.मालेगावात रास्ता रोकोमालेगाव : मालेगावात शेलू फाट्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. यामुळे अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जाम झाली होती. यावेळी गजानन बोरचाटे, विजय शेंडगे, भगवान बोरकर, दीपक शिंदे, प्रकाश बोरजे, मोहन देवळे, अरविंद जाधव, मधुकर राठोड, हरीभाऊ लहाने, केंद्रे यांच्यासह शेतकऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. यावेळी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.शिरपूर येथे गांधीगिरी मार्गाने आंदोलनशिरपूर जैन : शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिरपूर येथे गांधीगिरी मार्गाने शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात शिरपूर येथे ५ जून रोजी सकाळी १०.३० वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी हनुमानाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक तर जनावरांना भाजीपाला खावू घातला. शासनाविरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी शिरपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.मानोरा येथे सर्वपक्षीय एकवटलेमानोरा : शेतक ऱ्यांना कर्जमुक्ती व्हावी त्यासोबतच शेतमालाला भाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोमवार ५ रोजी शहरातल्या दिग्रस चौकात सर्वपक्षीयांतर्फे रास्ता रोको करण्यात आला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून व्यापारीवर्गानेसुद्धा आपली दुकाने बंद ठेवली होती. दिग्रस चौकात तिन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. शासन विरोधात विविध घोषणा दिल्या. आंदोलनात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पदाधिकारी सामील झाले होते. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड, माजी जि.प. सदस्य डॉ.सुभाष राठोड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इफ्तेखार पटेल, जिल्हा बँकेचे संचालक उमेश ठाकरे, जि.प.सदस्य सचिन रोकडे, जि.प.सदस्य अनिता राऊत, बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोठे, मानोरा पं.स. सभापती धनश्री राठोड, पं.स. उपसभापती रजनी गावंडे, खरेदी -विक्री संघाचे अध्यक्ष सुरेंद्र देशमुख, यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी पं.स. सदस्य आदींची उपस्थिती होती.कुकसा येथे रास्ता रोकोरिसोड: तालुक्यातील कुकसा येथे काँग्रेसचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी काँग्रेस मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतोष बाजड, नारायण बाजड, नवनाथ महाराज, विष्णू बाजड विजय नवघरे, दीपक बाजड, दीपक वालुकर, अनिल वानखेडे, अनिल बाजड, दत्ता बाजड, लोडजी बाजड, शंकर बाजड, हरिभाऊ जुनघरे, पांडुजी वानखेडे, रघु वानखेडे, रूपराव वानखेडे, गणेश बाजड, विठ्ठल बाजड, विजय बाजड, रामेश्वर बाजड, किशोर बाजड, अमोल बाजड, अरुण बाजड, राजू इडोळे, विश्वास बाजड, मनोज बाजड, से. समद से. महबूब, मनीष बाजड, गजानन सुरुसे, कैलास बाजड, सतीश गाभने, गजानन गवळी, गजानन रेलकर, प्रताप बाजड, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. सुमारे एक तास रास्ता रोको करण्यात आला. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.