शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध धार्मिक स्थळे विकासापासून कोसोदूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 18:57 IST

वाशिम: राज्य व देशपातळीवर नावलौकीक असलेली विविध धर्मियांची तिर्थस्थळे व पर्यटन स्थळे वाशिम जिल्ह्यात आहेत. मात्र, बंजारा समाजबांधवांच्या पोहरादेवीचा अपवाद वगळता इतर धार्मिक स्थळांच्या विकासासाठी आवश्यक असणाºया निधीची विशेष तरतूद शासनस्तरावरून अद्याप झालेली नाही. परिणामी, ही स्थळे विकासापासून कोसोदूर असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देदेशपातळीवर नावलौकीक असलेली तिर्थस्थळे व पर्यटन स्थळे वाशिम जिल्ह्यात विकासासाठी भरीव निधीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य व देशपातळीवर नावलौकीक असलेली विविध धर्मियांची तिर्थस्थळे व पर्यटन स्थळे वाशिम जिल्ह्यात आहेत. मात्र, बंजारा समाजबांधवांच्या पोहरादेवीचा अपवाद वगळता इतर धार्मिक स्थळांच्या विकासासाठी आवश्यक असणाºया निधीची विशेष तरतूद शासनस्तरावरून अद्याप झालेली नाही. परिणामी, ही स्थळे विकासापासून कोसोदूर असल्याचे दिसून येत आहे. जैन समाजबांधवांची काशी म्हणून ओळख असलेले शिरपूर जैन, ऐतिहासिक, पौराणिक वारसा लाभलेले श्री बालासाहेब संस्थान, मुस्लिम बांधवांचा ऐतिहासिक तºहाळा दर्गा, प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेले डव्हा संस्थान, विदर्भात प्रसिद्ध असलेले सखाराम बाबांचे संस्थान श्रीक्षेत्र लोणी हे वाशिम जिल्ह्यात वसले आहेत. याशिवाय वाशिम शहरातील पुरातन वेशी, तलाव प्राचीन वैभवाची साक्ष देतात़ सन १९९७ पूर्वी वाशिममध्ये काहीठिकाणी झालेल्या उत्खननात ऐतिहासिक, पौराणिक वास्तू आढळून आल्या होत्या. त्यानंतर मात्र निधीच्या तरतूदीअभावी पुढील उत्खननाची बत्ती गुल झाली, ती अद्याप ‘जैसे थे’ आहे. एकूणच या सर्व बाबींमुळे जिल्ह्याचा पर्यटकीयदृष्ट्या विकास रखडला असून शासनाने यासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी होत आहे.