शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केरोसीनच्या पुरवठयात प्रचंड कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 14:45 IST

वाशिम : अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यासाठी केरोसीनच्या पुरवठ्यात प्रचंड प्रमाणात कपात झाली असून, गत महिन्यात तीन लाख लिटर असलेला केरोसीनचा पुरवठा चालू महिन्यात केवळ ३५ हजार लिटरवर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यासाठी केरोसीनच्या पुरवठ्यात प्रचंड प्रमाणात कपात झाली असून, गत महिन्यात तीन लाख लिटर असलेला केरोसीनचा पुरवठा चालू महिन्यात केवळ ३५ हजार लिटरवर आला आहे.केंद्र शासनाकडून राज्य शासनाला केरोसीनचा पुरवठा करताना पात्र शिधापत्रिकारांची संख्या, शिधापत्रिकांवरील सदस्य संख्या आणि गॅसधारक संख्या यासह अन्य बाबी विचारात घेतल्या जातात. शिधापत्रिकेवर एक किंवा दोन सिलेंडरची नोंद असल्यास त्या कुटुंबाला केरोसीन दिले जात नाही. पात्र शिधापत्रिकाधारकांनी हमीपत्र सादर केले तरच केरोसीनचा पुरवठा होत आहे. ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांपर्यंत अद्याप या सुधारीत निकषाची माहितीच पोहचली नसल्याने आणि माहिती पोहचविण्याचे प्रयत्नही प्रशासनाकडून झाले नसल्याने आॅक्टोबर महिन्यातील केरोसीनच्या पुरवठ्यात प्रचंड घट आली आहे. सप्टेंबर २०१८ या महिन्यात वाशिम जिल्ह्यात तीन लाख लिटर केरोसीनचा पुरवठा झाला होता. आॅक्टोबर महिन्यात १७ तारखेला केवळ ३६ हजार लिटर केरोसीनचा पुरवठा झाला असून, हा पुरवठाही समप्रमाणात सहा तालुक्यात प्रत्येकी सहा हजार याप्रमाणात केला जाणार आहे. जर केरोसीनचा पुरवठा लाभार्थींचे हमीपत्र आणि शिधापत्रिकाधारकांची संख्या या निकषावर आधारीत असेल तर सहा तालुक्यात समप्रमाणात केरोसीनचा पुरवठा नेमका कोणत्या निकषावर होत आहे? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दिवाळीचा सण  १५ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, नेमके दिवाळी सणादरम्यानच केरोसीन मिळणार नसल्याने गोरगरीबांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.दरमहिन्यात प्रत्येक तालुक्यात ५० ते ६० हजार लिटर होणारा पुरवठा आता सहा हजारावर आल्याने केरोसीनचे वाटप नेमके कुणाला करावे? या गोंधळाने केरोसीन विक्रेतेही भांबावून गेले आहेत.

शिधापत्रिकेवरील गॅस सिलेंडरची नोंद आणि लाभार्थींचे हमीपत्र यानुसार आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्याला केरोसीनचा पुरवठा ३६ हजार लिटर झाला आहे.  लाभार्थींच्या हमीपत्रानुसार यामध्ये पुढील महिन्यात वाढही होऊ शकते.- देवराव वानखेडे,जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम