शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

शेतकरी आत्महत्या अपात्रतेचे प्रमाण वाढले

By admin | Updated: October 24, 2016 17:11 IST

जिल्ह्यात २०१५च्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण घटले;परंतु आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या आत्महत्या अपात्र होण्याचे प्रमाण मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढल्याचेही दिसत आहे.

ऑनलाइन लोकमत / दादाराव गायकवाड
वाशिम, दि. 24 - जिल्ह्यात २०१५च्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण घटल्याचे शासकीय आकडेवारीतून दिसते; परंतु विविध संकटांना कंटाळून आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या आत्महत्या अपात्र होण्याचे प्रमाण मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढल्याचेही दिसत आहे. 
 
शेतकरी आत्महत्या हा विषय नव्हे, तर ही एक अतिशय भीषण अशी समस्या असून, ती दिवसेंदिवस वाढतच आहे. के वळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात ही समस्या उग्र झाली आहे. मागील १६ वर्षांच्या काळात आजवर एकट्या वाशिम जिल्ह्यात १ हजार ३१२ शेतक-यांनी विविध संकटांमुळे आत्महत्या केली. त्यापैकी केवळ ५०७ शेतक-यांच्या आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्यात, तर तब्बल ७९४ शेतक-यांच्या आत्महत्या अपात्र ठरल्या असून, सप्टेंबर २०१६ ते आजवरच्या ११ शेतकरी आत्महत्या चौकशीत आहेत. त्यावरून आत्महत्यांच्या अपात्रेचे प्रमाण हे ३८.६४ टक्के असल्याचे स्पष्ट होते. मागील दोन वर्षांचा विचार केला, तर गतवर्षी जिल्ह्यात १०८ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले, तर यंदा आजवर ६४ शेतक-यांनी आत्महत्या केल्यात. मागील वर्षात आॅक्टोबर महिन्यापर्यत ८५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्या तुलनेत यंदा हे प्रमाण घटल्याचे म्हणता येत असले तरी, त्यामुळे ही समस्या क मी झाली, असे मुळीच म्हणता येणार नाही. गतवर्षी एकूण १०८ शेतकरी आत्महत्यांपैकी एकूण ६० आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या, यंदा मात्र चालू महिन्यापर्यंतच्या ६४ आत्महत्यांपैकी केवळ ३४ पात्र ठरल्यात, तर १९ अपात्र ठरल्या असून, ११ चौकशीत आहेत. गतवर्षीच्या पात्रतेचे प्रमाण जवळपास ५६ टक्के, तर यावर्षीच्या पात्रतेचे प्रमाण के वळ ५३ टक्के आहे.