शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

गटशेती योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 13:44 IST

वाशिम : गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गटशेतीला चालना देण्याची योजना सन २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात सहा गट स्थापन करण्याचा लक्ष्यांक असून या योजनेसाठी अर्ज करण्यास २५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कंपनी अधिनियम १९५८ च्या तरतुदीअंतर्गत शेतकरी उत्पादक गट अथवा कंपनी म्हणून नोंदणी असणे आवश्यक राहील.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गटशेतीला चालना देण्याची योजना सन २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याअंतर्गत प्रत्येकी २० शेतकरी गटाच्या माध्यमातून किमान १०० एकर क्षेत्रावर विविध कृषि व कृषिपुरक उपक्रम प्रकल्प स्वरुपात राबविण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यात सहा गट स्थापन करण्याचा लक्ष्यांक असून या योजनेसाठी अर्ज करण्यास २५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छूक शेतकºयांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी १३ जुलै रोजी केले. गटशेती योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करणाºया शेतकरी गटांचे क्षेत्र सलग किंवा किमान एका शिवारातील असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत इच्छुक शेतकºयांनी आत्मा संस्था, महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० अथवा कंपनी अधिनियम १९५८ च्या तरतुदीअंतर्गत शेतकरी उत्पादक गट अथवा कंपनी म्हणून नोंदणी असणे आवश्यक राहील. तसेच योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता शेतकरी गटांच्या सर्व सदस्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी सलंग्न असणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी गट, समुह, उत्पादक कंपनीची प्राथमिक निवड जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत केली जाणार आहे. योजनेच्या सविस्तर माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक, आात्मा कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गावसाने यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती