शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

विविध मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 15:09 IST

प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेनेदेखील ९ जानेवारी रोजी वाशिम येथे धरणे आंदोलन पुकारले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध प्रकारच्या २५ मागण्या प्रलंबित असून, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आशा, गटप्रवर्तक संघटनेने ९ जानेवारी रोजी वाशिम येथे धरणे आंदोलन पुकारले आहे. दुसरीकडे ७ प्रकारच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेनेदेखील ९ जानेवारी रोजी वाशिम येथे धरणे आंदोलन पुकारले.गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका, मदतनिस, मिनी अंगणवाडी सेविकांचा न्याय हक्कासाठी लढा सुरू आहे. जिल्हास्तरावर तर कधी राज्यस्तरावर आंदोलन व मोर्चे, उपोषण करूनही अंगवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटता नाही. याबरोबरच आशा, गटप्रवर्तक महिलांचा तसेच शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्याही मागण्या प्रलंबित आहेत. शालेय पोषण आहाराचे निश्चित मानधन १८ हजार रुपये करण्यात यावे, सेवेत कायम करण्यात यावे, शालेय पोषण आहार योजनेंतर्गत डाटा एंट्री आॅपरेटर यांना २० हजार रुपये मानधन द्यावे, शालेय शिक्षण समितीने स्वयंपाकी, मदतनिसांची केलेली नेमणूक कायमस्वरुपी करावी, शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मानधन, इंधन, भाजीपाला, बिस्किट आदींचे पैसे स्वयंपाकी, मदतनीस यांच्या बँक खात्यात जमा करावे, सेवेतून कमी करण्यात आलेल्या स्वयंपाकी, मदतनीस यांना तत्काळ कामावर घेण्यात यावे आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ८ जानेवारी रोजी देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत तसेच ९ जानेवारी रोजी वाशिम येथे बेमुदत उपोषण आंदोलन केले जाणार आहे, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय बाजड, जिल्हा उपाध्यक्ष नंदा कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिम