शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रवासी वाढवा अभियान’ वांध्यात

By admin | Updated: August 23, 2014 23:36 IST

सोयीसुविधांचा अभाव : भंगार बसेस, वाहक-चालकांची मनमानी

वाशिम: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) प्रवासी संख्या वाढवून महामंडळाची आर्थिकस्थिती मजबूत करण्यासाठी प्रवासी वाढवा विशेष अभियान राबविण्यात येत आहे; परंतु कित्येक ठिकाणच्या बसस्थानकावर प्रवाशांसाठी मुलभूत सोयीसुविधाच उपलब्ध नसून, वाहक, चालक ांच्या मनमानी कारभारामुळे या योजनेच्या यशस्वीतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, प्रवाशांची संख्या वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमी होत आहे. महाराष्ट्र्र राज्य परिवहन महामंडळाकडून गत १ ऑगष्ट २0१४ पासून प्रवासी वाढवा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. हे अभियान येत्या ३0 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यास अभियानांतर्गत किमान १ काऊंटने भारमान वाढविणार्‍या आगार, विभागास बक्षीस, प्राप्त परिणामांच्या दैनंदिन पृथ्थकरणासह असमाधानकारक नोंदणी करणार्‍या घटक कार्यालयांना मार्गदर्शन, प्रवाशाभिमूख योजनांची प्रसिद्धी आणि विविध पासचा खप वाढविण्याचे प्रयत्न, प्रवासी संख्या वाढविण्यासाठी विनंतीनुसार नियोजित बसथांब्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रवासी चढउतार, उद्दिष्ट पूर्तीसाठी सकारात्मक प्रयत्न न करणार्‍या अधिकारी, पर्यवेक्षकांच्या कामगिरीची गंभीर दखल, अशा प्रकारच्या काही योजना महामंडळाने आखल्या आहेत. त्याशिवाय अभियान कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणारे विभाग, आगार आणि वाहकांसाठी पुरस्कारही महामंडळाकडून देण्यात येणार आहेत. प्रवाशांनी महामंडळाच्या बसने प्रवास करावा म्हणून त्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्नही करण्यात येत आहेत; परंतु ह्यप्रवाशांच्या सेवेसाठीह्ण हे ब्रिदवाक्य असलेल्या महामंडळाकडे प्रवाशांना आर्कषित करण्यासाठी काहीही असल्याचे दिसत नाही. महामंडळाच्या बसेसची नेहमीची अनियमितता, बसेसची भंगार अवस्था, बसस्थानकावरील मुलभूत सोयीसुविधांचा अभाव आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे न परवडणारे भाडे, या कारणांमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसकडे प्रवासी पाठ फिरवित आहेत. अनेक ठिक ाणच्या बसस्थानकावर घाण कचर्‍याचे साम्राज्य असून, बसस्थानकावरील डांबरीकरण केलेले परिसर खड्डेमय झाले आहेत. गावांची नावे दर्शविणारे फलकही संबंधित फलाटावर दिसत नाहीत. महिलांच्या सोयीसाठी असलेले हिरकणी कक्षही काही ठिकाणांवर नाहीत. काही बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नाही. प्रवासी वाढवा अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजित बसथांब्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रवाशांच्या विनंतीनुसार बस थांबविण्याच्या सूचना असतानाही काही वाहक, चालक तसे करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. एसटी महामंडळाने काही उद्दिष्टे डोळय़ांसमोर ठेवली आहेत. त्यामध्ये प्रवाशांसाठी आरामदायी, सुरक्षित व अपघात विरहित सेवा, खासगी प्रवास वाहतुकीशी सक्षमपणे स्पर्धा, प्रवाशांशी सौज्यपूर्ण वागणूक, गाव तेथे एसटी, ग्रामीण भागात नवीन बसेस, अत्याधुनिक बसगाड्यांचा वापर, गर्दी व कमी गर्दीच्या हंगामानुसार स्पर्धात्मक प्रवासभाडे, बसस्थानकांचे सौंदर्यीकरण व स्वच्छता, आदिंचा समावेश आहे. एसटीची महत्त्वाची समस्या म्हणजे भंगार बसेस. एसटीच्या कित्येक बसेस नादुरुस्त असतानाही या बस रस्त्यावर धावतात. त्यामुळे एखादी बसमध्येच बंद पडते आणि प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. अशा बसमध्ये बसलेल्या काही प्रवाशांची महत्त्वाची कामे वेळ निघून गेल्यामुळे पूर्ण होऊ शकत नाहीत, तसेच उपचारासाठी जात असलेल्या रुग्णांची प्रकृती गंभीर होण्याची शक्यता असते. त्याशिवाय सततचीे अनियमितता हीसुद्धा एसटीची महत्त्वाची समस्या असून, बसेसच्या अनियमिततेचा फ टका प्रवांना सहन करावा लागतो. ग्रामीण भागातील अनेक बसफेर्‍याही महामंडळाकडून मध्येच बंद करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे प्रवाशांचा कल खासगी वाहतुकीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.