लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाबासाहेब ऊर्फ गोविंदराव सरनाईक यांचे शनिवारी रात्री अकोला येथे ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मूळगावी कवठा येथे रविवारी दुपारी २ वाजता शोकाकुल वातावरणात तथा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सरनाईक यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील राजकीय पदाधिकार्यांसह त्यांच्या चाहत्या वर्गाने मोठय़ा संख्येने हजेरी लावली. बाबासाहेब सरनाईक यांचे पार्थिव अकोल्यावरून त्यांच्या मूळगावी कवठा चिखली येथे रविवारी सकाळी आणण्यात आले. दुपारी १ वाजता त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून निघाली असता, त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांसह प्रशासन अधिकारी या नात्याने रिसोड येथील नायब तहसीलदार बी.बी. बरवे यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. अंत्यसंस्कारावेळी पोलीस दलातर्फे हवेत तीन फैरी झाडून माजी मंत्री बाबासाहेब यांना भावपूर्ण मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांचे थोरले पुत्र डॉ. तिलकराज यांनी मुखाग्नी दिला. यावेळी माजी खासदार अनंतराव देशमुख, विरोधी पक्षनेते माणिकराव ठाकरे यांचे चिरंजीव राहुल ठाकरे, माजी आमदार दाळू गुरुजी, डॉ.जगन्नाथ ढोणे, विठ्ठलराव शिंदे, अँड.विजयराव जाधव, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड. दिलीपराव सरनाईक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष वामनराव देशमुख, डॉ. चंद्रशेखर देशमुख, लखनसिंह ठाकूर, माजी जि.प. सदस्य दिलीपराव देशमुख, बाळासाहेब खरात, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिलीप आसरे, वाय.के.. इंगोले, अँड.पी.पी. अंभोरे आदींची उपस्थिती होती.
माजी मंत्री सरनाईक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:19 IST
रिसोड: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाबासाहेब ऊर्फ गोविंदराव सरनाईक यांचे शनिवारी रात्री अकोला येथे ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मूळगावी कवठा येथे रविवारी दुपारी २ वाजता शोकाकुल वातावरणात तथा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी मंत्री सरनाईक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ठळक मुद्देहजारो चाहत्यांची उपस्थितीपोलीस दलातर्फे मानवंदना