शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यानंतरही घरकुल उद्दिष्ट अप्राप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 11:39 IST

यावर्षी ही योजना रेंगाळणार की काय? अशी भीती वर्तविण्यात येत आहे.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याने याचा फटका अन्य योजनांना बसत आहे. प्रधानमंत्री तसेच रमाई आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) यावर्षी निधीही मिळाला नसल्याने अद्याप जिल्ह्याला घरकुलाचे उद्दिष्ट मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी ही योजना रेंगाळणार की काय? अशी भीती वर्तविण्यात येत आहे.ग्रामीण भागातील मागासवर्गीय, दारिद्र्यरेषेखालील, निराधार, बेघर, दिव्यांग आदी घटकातील पात्र लाभार्थींना राहण्यासाठी निवाऱ्याची सुविधा म्हणून शासनाच्या विविध योजनेंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जातो. ग्रामीण भागात रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येते. रमाई आवास योजनेंतर्गत एससी, नवबौद्ध घटकातील लाभार्थींना घरकुलाचा लाभ देण्यात येतो. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थींना घरकुलाचा लाभ दिला जातो. दरवर्षी साधारणत: एप्रिल महिन्यात जिल्हानिहाय घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात येते. त्याअनुषंगाने लाभार्थींकडून प्रस्ताव मागविणे, छाननी आणि निवड आदी प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर पात्र लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी मे महिन्यात अनुदानाचा पहिला टप्पा देण्यात येतो. यावर्षी १० आॅगस्ट उजाडला; तथापि घरकुलासाठी अनुदान किंवा उद्दिष्ट प्राप्त झाले नाही.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर होत असल्याने अन्य योजनांच्या निधीला कात्री लावली जात आहे. रमाई किंवा प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत २०२०-२१ साठी कोणताही निधी शासनाकडून प्राप्त झाला नाही. त्यामुळे यावर्षी ही योजना रेंगाळण्याची भीती लाभार्थींमधून वर्तविण्यात येत आहे.ग्रामीण भागातील पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ देण्यासाठी रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येते. यावर्षी योजनेंतर्गत जिल्ह्याला आतापर्यंत शासनाकडून निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे घरकुलाचे उद्दिष्ट निश्चित करता आले नाही. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर घरकुलाचे उद्दिष्ट निश्चिती आणि पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात आली.- डॉ.व्ही.एन. वानखेडेप्रभारी प्रकल्प संचालकजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना