शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तालुकास्तरावर कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:42 IST

वाशिम : जिल्ह्यातील शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांना खरीप हंगाम २०२१ मध्ये बियाणे, खते व कीटकनाशकाबाबत येणाऱ्या ...

वाशिम : जिल्ह्यातील शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांना खरीप हंगाम २०२१ मध्ये बियाणे, खते व कीटकनाशकाबाबत येणाऱ्या अडचणी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे त.शेतकऱ्यांसाठी कृषी अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीरदेखील करण्यात आले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाने जे निर्बंध लागू केले आहे. त्यामुळे बियाणे, खते व कीटकनाशके यांचे उत्पादन, प्रक्रिया, वाहतूक वितरण व विक्री करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. निर्माण झालेल्या परिस्थितीत सदर निविष्ठाचा काळा बाजार व साठेबाजी रोखण्यासाठी त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करण्याचे काम या संनियंत्रण कक्षामार्फत केले जाणार आहे.

जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष पुढीलप्रमाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी उपसंचालक एन. आर. ठोंबरे (भ्रमणध्वनी क्र. ९४२१९३६६९१), कृषी सहायक डी. पी. आरु (९४०४२५२६७९), जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मोहीम अधिकारी सी. पी. भागडे (८८०५८१०५१८), ग्रामविकास अधिकारी एस. के. इंगळे (९७६३२०२२८५), उपविभागीय स्तरावरील कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष तंत्र अधिकारी श्री. पल्लेवाड (७७४४८२२००१), धांडे (९४२०१२४९५४), वाशिम तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ (९४२३१२८६२६), कृषी सहायक तक्रस (७५८८७९३६१७), पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर. पी. भद्रोड (९९७५७०११५५), विस्तार अधिकारी ए. एस. मुळे (९७६३७३५३४६), मालेगांव तालुका- तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जांभरुनकर (९४०५९६६९६६), कृषी सहायक मानवतकर (९९२२२८४८५४), कृषी अधिकारी एस. एल. अवचार ( ९८२२७६३९०५), विस्तार अधिकारी बी. एन. ठाकरे (९६८९६६०५०९), रिसोड तालुका- तालुका कृषी अधिकारी घोलप (९४०५९६६९६६), कृषी अधिकारी मानवतकर ( ९९२२२८४८५४), कृषी अधिकारी आर. एन. जोशी (७८७५५८४२४३), पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गावंडे (९७६६४९६३०५), मंगरुळपीर तालुका- तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले ( ९४०४०९३९८६), कृषी अधिकारी अशोक इंगोले (९४२०३५३३०९), पंचायत समितीचे कृषी अधिकारी पी. एस. शेळके (९२८४५६६३०९), विस्तार अधिकारी आर. बी. वाडणकर (७५८८०९०४५०), मानोरा तालुका- तालुका कृषी अधिकारी के. डी. सोनटक्के (९४०४३३८२१६), कृषी पर्यवेक्षक एस. एन. मनवर (९३२९११८९३८), पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी. एस. मकासरे ( ९९२१४७३९५५), विस्तार अधिकारी ( ९०११५५५३९४, कारंजा तालुका- तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके ( ९४२२९२१०९०), कृषी अधिकारी प्रमानंद राऊत (९४८४९२४०८०), पंचायत समिती कारंजाचे कृषी अधिकारी पी. एस. देशमुख ( ७५८८७६३४२७), विस्तार अधिकारी एस. व्ही. कोल्हे (९८८१९४८२२५) यांचा या सनियंत्रण कक्षात समावेश आहे.

बियाणे, खते व कीटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठयाच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणीचे वा तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षांशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजता दरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. तक्रार नोंदवायची असल्यास ईमेलवरसुद्धा तक्रार नोंदविता येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी सांगितले.