शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल कामात दिरंगाई करणारे अभियंते रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 16:30 IST

दोन ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी संबंधित एजन्सीकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागातील घरकुल कामात दिरंगाई होत असल्याचा फटका लाभार्थींना बसत आहे. दिरंगाईस कारणीभूत असलेल्या अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून, दोन ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी संबंधित एजन्सीकडे केली आहे.ग्रामीण भागातील बेघर, भूमिहीन व पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ देण्यासाठी रमाई आवास योजनेसह घरकुलाच्या अन्य योजना राबविल्या जात आहेत. पात्र लाभार्थींची घरकुलासाठी निवड झाल्यानंतर बांधकामाला गती मिळण्याबरोबरच आवश्यक ते प्रशासकीय सोपस्कार पार पाडणे, लाभार्थींना अनुदानाचा लाभ विनाविलंब देण्याची जबाबदारी अधिकारी, कर्मचाºयांवर सोपविण्यात आली आहे. ग्रामीण भागात घरकुलासंदर्भात राबविण्यात येणाºया विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बाह्य यंत्रणेद्वारे (एजन्सी) जिल्ह्यात काही ‘ग्रामीण गृहनिर्माण अभियंते’ नियुक्त केले आहेत. या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी घरकुलविषयक योजनांना गती देणे अपेक्षीत आहे. घरकुलविषयक योजनांचा आढावा घेताना रिसोड तालुक्यात दिरंगाई झाल्याची बाब समोर आली. वारंवार सूचना व समज देऊनही ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी कामकाजात सुधारणा न केल्याने शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना बडतर्फ करण्याची शिफारस संबंधित एजन्सीकडे केली असून, दिरंगाई करणाºयांविरूद्ध कारवाईचा इशारा मीना यांनी दिला.

अनुदान प्रलंबित असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहनघरकुल, सिंचन विहीर यासह ग्रामीण भागातील अन्य काही योजनेंतर्गतचे अनुदान संबंधित लाभार्थींना विनाविलंब मिळणे अपेक्षीत आहे. मात्र, पंचायत समिती स्तरावरून अनुदान विनाविलंब मिळत नाही. या पृष्ठभूमीवर पंचायत समिती स्तरावरून विविध योजनेंतर्गतचे अनुदान संबंधित लाभार्थींना विनाविलंब देण्यात यावे, असे निर्देश सीईओ मीना यांनी गटविकास अधिकाºयांसह संबंधित यंत्रणेला दिले. तसेच घरकुल, विहिरीचे बांधकाम त्या-त्या टप्प्यावर पूर्ण झाल्यानंतरही अनुदान मिळत नसेल तर संबंधित लाभार्थींनी जिल्हा परिषदेशी किंवा मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना