शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड शहरातील रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 15:19 IST

रिसोड -  नगर परिषदेने १२ मार्चला रस्त्यावरील फळ व भाजीपाला विक्रेत्यांच्या गाडया हटविल्या.

ठळक मुद्देरस्त्यावर पुन्हा भाजी व फळ विक्रेत्यांनी हातगाड्या मांडल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला. भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरील आपली हातगाडे हटविले नाही तर नगर परिषदेकडून १५०० रुपयांचा दंडसुद्धा आकारला होता. नगर परिषद अध्यक्ष भारती क्षीरसागर यांनी या कामी पुढाकार घेत रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

रिसोड -  नगर परिषदेच्या आदेशाला केराची टोपली दाखवित भाजीविक्रेत्यांनी पुन्हा एकदा रिसोड शहरातील लोणी फाटा ते आंबेडकर चौक रस्त्यालगत ‘दुकानदारी’ थाटली असल्यासंदर्भात लोकमतने १२ मार्च रोजी वृत प्रकाशित केले होते. याची दखल घेत नगर परिषदेने १२ मार्चला रस्त्यावरील फळ व भाजीपाला विक्रेत्यांच्या गाडया हटविल्या.पूर्वी या रस्त्यावर अतिक्रमण करून भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरच बस्तान मांडले होते. यावर कायम नियंत्रण मिळण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष यशवंत देशमुख व नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी भाजी विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून  समस्या संपूर्णता मिटविली होती.  यासाठी यशवंत देशमुख यांना अनेक दबावतंत्राचा वापरसुद्धा करावा लागला होता. यासाठी त्यांना नगरसेवक व  माजी नगराध्यक्ष वसंतराव इरतकर यांची मोलाची साथ मिळाली होती. यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाल्याने शहरवासियांनी सुटकेचा श्वास सोडला होता. त्यानंतर या रस्त्यावर पुन्हा भाजी व फळ विक्रेत्यांनी हातगाड्या मांडल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला. हातगाडे व भाजी विक्रेते हटविण्यासाठी स्थानिक भाजी बाजारातील विक्रेत्यांनी नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे मागणी सुद्धा केली होती. परंतु या भाजी विक्रेत्यावर कुठलाही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नव्हती. या भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरील आपली हातगाडे हटविले नाही तर नगर परिषदेकडून १५०० रुपयांचा दंडसुद्धा आकारला होता. तशा सूचनाही काही दिवसांपूर्वी नगरपरिषदने दिल्या होत्या. या ऊपरही रस्त्यावर गाडया लावल्या जात होत्या. या संदर्भात लोकमतने १२ मार्चला वृत प्रकाशित करताच, नगर परिषद अध्यक्ष भारती क्षीरसागर यांनी या कामी पुढाकार घेत रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्या अनुषंगाने सदर मोहिम राबविण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड