शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या ४५५ हेक्टर जमीनीवर अतिक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 20:47 IST

वाशिम जिल्हयातील वनविभागाच्या ताब्यातील सुमारे १२०० एकरपेक्षा अधिक जमिनीवर अतिक्रमण झाले असून महसूल विभागाकडून झालेल्या चुकीच्या क्षेत्र मोजणीमुळे ते हटविणे अशक्य ठरत आहे.

ठळक मुद्दे वृक्षलागवड प्रभावितमहसूल विभागाच्या मोजणी प्रक्रियेत झाल्या चुका!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हयातील वनविभागाच्या ताब्यातील सुमारे १२०० एकरपेक्षा अधिक जमिनीवर अतिक्रमण झाले असून महसूल विभागाकडून झालेल्या चुकीच्या क्षेत्र मोजणीमुळे ते हटविणे अशक्य ठरत आहे. परिणामी, वनाच्छादित क्षेत्र वाढविणेही कठीण झाल्याची माहिती सुत्रानी शनिवार, २६ आॅगस्टला दिली.जिल्ह्यातील वाशिम-रिसोड वनपरिक्षेत्रात ६५०६ हेक्टरचा परिसर वनाच्छादित असून त्यापैकी १२४ हेक्टर अर्थात ३१० एकरवर अतिक्रमण आहे. त्यात शिरपूटी (ता.वाशिम) येथे ३६ आणि वाकद (ता.रिसोड) येथे ८८ हेक्टरचा समावेश आहे. मानोरा तालुक्यात १३ हजार २६० हेक्टरचा परिसर वनविभागाच्या ताब्यात असून त्यापैकी ४३ हेक्टरवर अतिक्रमण झालेले आहे. कारंजात ८ हजार हेक्टरपैकी ८८.८१ हेक्टर; तर मेडशी वनविभागांतर्गत एकूण १० हजार हेक्टर क्षेत्रापैकी २०० हेक्टरच्या आसपासचा परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.दरम्यान, वनविभागाकडून हे अतिक्रमण हटविण्याचा अनेकवेळा प्रयत्न झाला; परंतू महसूल विभागाकडून यापुर्वी झालेल्या शेतीच्या मोजण्यांमध्ये बºयाचशा चुका झाल्याने तद्वतच गेल्या अनेक वर्षांपासून शेती क्षेत्र वाढविण्याच्या नादात वनविभागाच्या ताब्यातील जमिनी काही शेतकºयांनी बळकावल्यामुळे अतिक्रमण हटवताना त्रास होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

वनविभागएकूण क्षेत्रअतिक्रमित क्षेत्र
वाशिम-रिसोड६,५०६ हेक्टर१२४ हेक्टर
कारंजा-मानोरा२१,२६० हेक्टर१३१ हेक्टर
मेडशी-मालेगाव१०,००० हेक्टर२०० हेक्टर

 

वनविभागाच्या जमिनींवर झालेले अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही निरंतर सुरू आहे. काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्याने निकाल लागेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. अतिक्रमणधारकांनीही कारवाई टाळण्यासाठी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढायला हवे.- एस.व्ही.नांदुरकरवनपरिक्षेत्र अधिकारी, वाशिम.