शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

शिक्षकांना वेतनाची ‘हुलकावणी’!

By admin | Updated: May 16, 2016 01:17 IST

वाशिम जिल्हा परिषदेच्या वित्त विभाग व पंचायत समितीमधील असमन्वयाचा फटका.

वाशिम: जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षकांना मार्च- एप्रिल या दोन महिन्यांचे वेतन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अदा करण्याचे वित्त विभाग व पंचायत समित्यांचे आश्‍वासन १४ मे पर्यंंतही अंमलात आले नाही. वेतन नसल्याने शिक्षकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात जि.प.चे जवळपास ३५00 शिक्षक आहेत. जिल्ह्यातील सहा पंचायत समिती व जिल्हा परिषद लेखा विभागाच्या असमन्वयामुळे शिक्षकांना वेतनापासून वंचित राहावे लागत आहे. या शिक्षकांना गत दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने बँकांचे कर्ज, विविध प्रकारच्या पॉलिसी, गृह कर्ज यासह अन्य प्रकारचे व्यवहार ठप्प झाले आहेत. वेतन देण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी वित्त विभाग व पंचायत समिती प्रशासनाकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने वित्त विभागाने वाशिम जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधी खात्यामधून शिक्षकांच्या वेतनापोटी ११ कोटी २४ लाख ६८ हजार रुपये संबंधित पंचायत समित्यांना, त्यांच्या तालुका शाखेतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा निधी खात्यामध्ये जमा करण्यासाठी ३0 एप्रिल २0१६ रोजी मंजुरी दिली होती. याबाबतच्या सूचनाही संबंधित पंचायत समितीच्या प्रशासनाला दिलेल्या आहेत, असे जि.प. चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. देवीदास हिवाळे यांनी ६ मे रोजी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले होते. वाशिम पंचायत समितींतर्गतच्या शिक्षकांचे वेतन का मिळाले नाही, यासंदर्भात लेखाधिकारी हेंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता, जिल्हा परिषदेकडून ३ मेच्या दरम्यान पंचायत समितीला ह्यवित्तह्ण प्राप्त झाले असून, चार-पाच दिवसांत वेतन अदा केले जाईल, असे ६ मे रोजी सांगितले होते; १0 मे पर्यंंतही वेतन झाले नसल्याने शिक्षक संघटनांनी वित्त विभाग व पंचायत समित्यांकडे वेतनाची मागणी केली असता, दोन-चार दिवसांत वेतन होईल, असे आश्‍वासन दिले. मात्र १५ मे पर्यंंतही शिक्षकांचे वेतन झाले नाही. वेतन झाले नसल्यामुळे विविध प्रकारच्या कर्जावरील व्याजाचा भुर्दंड शिक्षकांना सहन करावा लागणार आहे.