शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणी मोहिमेसंदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 16:37 IST

वाशिम : २ व ३ मार्च २०१९ रोजी वाशिम तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर राबविण्यात येणाºया विशेष मतदार नोंदणी मोहीमेसंदर्भात १ मार्च रोजी वाशिम तहसिल कार्यालयात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २ व ३ मार्च २०१९ रोजी वाशिम तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर राबविण्यात येणाºया विशेष मतदार नोंदणी मोहीमेसंदर्भात १ मार्च रोजी वाशिम तहसिल कार्यालयात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले.अद्याप मतदार यादीत नाव न नोंदविलेल्या पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविता यावे, याकरिता २ मार्च व ३ मार्च २०१९ रोजी सर्व मतदान केंद्रांवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी ऋषीकेश मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची इत्यंभूत माहिती देण्यासाठी तहसिल कार्यालयातील सभागृहात दोन टप्प्यात संबंधित बीएलओ आणि कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या टप्प्यात सकाळी ११ वाजता शहरातील तसेच दुसºया टप्प्यात दुपारी ३ वाजता ग्रामीण भागातील बीएलओ व कर्मचाºयांना प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तहसिलदार विजय साळवे, निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार दीपक दंडे यांनी बीएलओ व कर्मचाºयांना मार्गदर्शन करताना एकूण २०८ कर्मचाºयांनीदेखील संबंधित त्या-त्या मतदान केंद्रांवर उपस्थित राहून जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, अशा सूचना दिल्या.पात्र नागरिकांना मतदार नोंदणीची संधी मिळावी म्हणून भारत निवडणूक आयोगाने २ व ३ मार्च २०१९ रोजी रोजी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर या विशेष मोहिमेचे आयोजन केले असून, या मोहिमेदरम्यान मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६ अर्ज, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अनिवासी मतदाराने नमुना ६ अ अर्ज, मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी नमुना ७ अर्ज, मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी नमुना ८ अर्ज अथवा मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी नमुना ८ अ अर्ज सादर करता येतील. सर्व अर्जांचे नमुने संबंधित मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.

टॅग्स :washimवाशिम