शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

३५ पैकी २५ किलोमीटर अंतरावर खड्ड्यांचेच साम्राज्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:36 IST

वाशिम: जिल्ह्यातील मंगरुळपीर-अनसिंग या ३५ किलोमीटर अंतराच्या मार्गावर जवळा ते धानोरादरम्यानच्या २५ किलोमीटर अंतरावर केवळ मोठमोठ्या खड्ड्यांचेच साम्राज्य आहे. त्यामुळे या मार्गावर वाहन चालविणाºयांना आपला जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत. 

ठळक मुद्देअनसिंग-मंगरूळपीर मार्गाची दशाजीव मुठीत घेऊन वाहनधारकांचे मार्गक्रमण 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील मंगरुळपीर-अनसिंग या ३५ किलोमीटर अंतराच्या मार्गावर जवळा ते धानोरादरम्यानच्या २५ किलोमीटर अंतरावर केवळ मोठमोठ्या खड्ड्यांचेच साम्राज्य आहे. त्यामुळे या मार्गावर वाहन चालविणाºयांना आपला जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत. अनसिंग-मंगरुळपीर हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. या मार्गावर मंगरुळपीर ते अनसिंग दरम्यान एसटी बसगाड्यांशिवाय काळीपिवळी, आॅटोरिक्षा या खाजगी प्रवासी वाहनांसह मालवाहू ट्रक मोठ्या संख्येने धावतात. आता या रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर झाली असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. तथापि, गेल्या दिड वर्षापासून या मार्गावर जागोजागी खड्डे पडले असतानाही मार्गाची दुरुस्ती करण्याची तसदी मात्र घेण्यात आलेली नाही. ठिकठिकाणी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेतच शिवाय कुठे कुठे, तर आठ फुट अंतरापर्यंतच मार्गच उखडला असून, निव्वळ खडीवरून वाहने धावत आहेत. यामुळे मार्गावर प्रवास करताना केवळ शिल्लक वेळच लागत नाही, तर खड्डे वाचविण्याचा प्रयत्न चालक करीत असल्याने वाहन सारखे आदळत असल्याने प्रवाशांची हाडेही खिळखिळी होत आहेत. या मार्गावर चालकाचे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला आमंत्रण अशीच स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.  याच मार्गावरील तीन नाल्यांवर असलेल्या पुलांची उंची आधीच कमी असताना त्या ठिकाणी मार्गाची अत्यंत दूरावस्था झाल्याने एखादवेळी खड्डे वाचविताना वाहन पुलात कोसळण्याची भितीही आहे. यातील एक पुल नांदगावनजिक, दुसरा कुंभीनजिक, तर तिसरा पुल जवळ्यानजिक आहे.  

मंगरुळपीर आगाराची हिंगोली बसफेरी बंद मंगरुळपीर येथून हिंगोलीकडे जाण्यासाठी अनसिंग मार्ग जवळचा असल्याने या मार्गावर मंगरुळपीर आगाराकडून वर्षभरापूर्वी हिंगोलीसाठी बसफेरी सुरू करण्यात आली होती; परंतु अवघ्या काही दिवसांतच या मार्गाची दूरवस्था झाल्याने या मार्गावरून बस चालविणे कठीण झाले, तसेच मार्गावरील खड्ड्यांमुळे वृद्ध प्रवाशांसह बालकांना प्रवासादरम्यान अतोनात त्रास सहन करावा लागत होता. त्याशिवाय बसचेही नुकसान होण्याची शक्यता होती. याच कारणामुळे मंगरुळपीर आगाराकडून ही बसफेरी बंद करण्यात आली.  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा