शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ‘रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट’ वर भर; ४९६३ जणांची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 13:27 IST

जिल्ह्यात वाढता कोरोना विषाणू संसर्ग लक्षात घेता रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट मोहिमेला जिल्हा आरोग्य विभागाने अधिक वेग दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, १४ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या अहवालानुसार जिल्ह्यात १०९५ लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात आरोग्य विभागाने आजवर केलेल्या ४९६३ रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात वाढता कोरोना विषाणू संसर्ग लक्षात घेता रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट मोहिमेला जिल्हा आरोग्य विभागाने अधिक वेग दिला असून, प्रत्येक तालुक्यात ही मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिकच तेजीत असून, यामध्ये शुक्रवारी ९ जणांची भर पडली. बाहेरगावावरून परतणाºया नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच बाधित रुग्ण आढळलेल्या गावांत आरोग्य विभागाने रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टद्वारे तपासणी सुरू केली आहे. यात आजवर ४९६३ लोकांची जिल्हा आरोग्य विभागाने तपासणी केली असून, त्यात २६७ लोकांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.जिल्ह्यातील शहरांसह ८८ गावांत कोरोना संसर्गाने शिरकाव केला आहे. त्यात १०८८ लोकांना कोरोना विषाणू संसर्ग झाला असून, बाहेरच्या जिल्ह्यात उपचार घेणाºया दोघांसह एकूण २० जणांचा मृत्यू झाला, ६९८ लोकांनी कोरोनावर मातही केली, तर ३७० लोकांवर अद्याप उपचार करण्यात येत आहेत. या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाने कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टवर अधिक भर दिला आहे. त्यामुळे बाधिताच्या संपर्कातील रुग्ण शोधून काढण्यास मदत मिळत असल्याचे प्राप्त अहवालावरून दिसून येत आहे.

जिल्ह्याला आणखी पाच हजार किट मिळणारजिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तातडीने तपासणी व्हावी, त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावेत म्हणून आरोग्य विभागाने रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टचा आधार घेतला आहे. या किट आमदार निधीतून उपलब्ध करण्यात येत असून, जिल्ह्यात या अंतर्गत आणखी ५००० हजार रॅपिड टेस्ट किट शनिवारपर्यंत उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली आहे. त्यामुळे अधिक रुग्णांची तपासणी शक्य होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या