शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पात्र लाभार्थीचे ३० हजाराचे अनुदान दुसऱ्याच्याच बँक खात्यात केले जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 18:11 IST

वाशिम- नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहणारी रिसोड पंचायत समिती पुन्हा एकदा घरकुल योजनेतील अनुदान वाटपावरून चर्चेत आली आहे.

ठळक मुद्देकमल ज्ञानबा धुळधुळे यांचे ३० हजार रुपयांचे अनुदान दुर्गा सोपान धुळधुळे यांच्या बँक खात्यात जमा झाले तर दुर्गा धुळधुळे यांचे ३० हजार रुपयांचे अनुदान रिठद येथीलच अन्य एका प्रतिक्षा यादीतील लाभार्थीच्या बँक खात्यात जमा झाले.

- संतोष वानखडेवाशिम- नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहणारी रिसोड पंचायत समिती पुन्हा एकदा घरकुल योजनेतील अनुदान वाटपावरून चर्चेत आली आहे. रिठद येथील एका लाभार्थीचे ३० हजार रुपयांचे अनुदान दुसºयाच लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्याचा प्रताप सन २०१७ मध्ये करण्यात आला. एक वर्षे लोटले तरी अद्याप चुकीची दुरूस्ती झाली नसल्याने पात्र लाभार्थीचे घराचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.‘सर्वांसाठी घरे’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात रिठद ता. रिसोड येथील दुर्गा सोपान धुळधुळे, कमल ज्ञानबा धुळधुळे या दोन लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळाला. घरकुल बांधकाम करण्यासाठी अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून ३० हजार रुपये लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जातात. यासाठी लाभार्थींकडून अचूक बँक खाते मागविले जाते. दुर्गा सोपान धुळधुळे व कमल ज्ञानबा धुळधुळे यांनी अचूक बँक खाते क्रमांक दिल्यानंतर पंचायत समिती स्तरावरील संबंधित कर्मचाºयाने चुकीचे बँक खाते क्रमांक ‘फिडींग’ केल्याने अनुदान वितरणाचा घोळ निर्माण झाला. कमल ज्ञानबा धुळधुळे यांचे ३० हजार रुपयांचे अनुदान दुर्गा सोपान धुळधुळे यांच्या बँक खात्यात जमा झाले. तर दुर्गा धुळधुळे यांचे ३० हजार रुपयांचे अनुदान रिठद येथीलच अन्य एका प्रतिक्षा यादीतील लाभार्थीच्या बँक खात्यात जमा झाले. घरकुल बांधकाम करण्यासाठी अचूक बँक खात्यात ३० हजार रुपयांची रक्कम जमा झाली नसल्याने ही बाब गटविकास अधिकाºयांच्या निदर्शनात आणून देण्यात आली. एका वर्षानंतरही बँक खाते क्रमांकात दुरूस्ती झाली नसल्याने घरकुल बांधकामाचे स्वप्न धुळीस मिळाले. प्रतिक्षा यादीतील अन्य लाभार्थीच्या बँक खात्यात जमा झालेली ३० हजार रुपयांची रक्कम अद्याप पंचायत समिती प्रशासनाने परत घेतली नाही. 

 मी रिसोड येथे रूजू होण्यापूर्वीचे सदर प्रकरण आहे. बँक खाते क्रमांकाची दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे अद्याप दुरूस्ती झाली नाही. दुसºया लाभार्थीच्या बँक खात्यात चुकीने जमा केलेली ३० हजार रुपयांची रक्कम परत मिळावी, यासाठी नोटीस बजावली आहे. अद्याप त्या लाभार्थीने ३० हजार रुपये परत केले नाहीत. धुळधुळे या लाभार्थीला न्याय मिळावा यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे मार्गदर्शन मागविले आहे. घरकुलाचे अनुदान अचूक बँक खाते क्रमांकावर जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.- शिवशंकर भारसाकळे, गटविकास अधिकारी, रिसोड.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड