लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक मंगळवारी वेस येथील देशी दारूच्या दुकानामुळे जवळच असलेल्या मानसी नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थिनी त्रस्त झाल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन सदर दुकान सेक्शन १४२ नुसार बंद करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थिनींनी ९ जून रोजी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली.मानसी नर्सिग कॉलेजमध्ये ४0 विद्यार्थिनी शिकत असून, तेथेच त्यांचे वास्तव्यदेखील आहे. गत दोन महिन्यांपासून कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या देशी दारूच्या दुकानामध्ये मद्यपींची प्रचंड गर्दी होत आहे. विद्यार्थिनींना ही बाब त्रासदायक ठरली असून, दारूचे दुकान तत्काळ बंद करण्याची मागणी यावेळी विद्यार्थिनींनी लावून धरली.
दारूचे दुकान हटविण्यासाठी ‘एल्गार’!
By admin | Updated: June 10, 2017 02:12 IST